Bribe Crime : लष्कराच्या नौदलात खलाशी भरतीसाठी इच्छुक तरुणांच्या वैद्यकीय चाचणीपोटी पैसे घेणाऱ्या नौदलाच्या एका जवानावर कारवाई करण्यात आली आहे.
संजू अरलीकट्टी (भारतीय नौदल हॉस्पिटल स्टेशन, कुलाबा, मुंबई) असे संशयित जवानाचे नाव आहे. नौदलाच्या खलाशी लष्करी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांकडून पैसे घेण्याचा त्याच्यावर आरोप आहे. (Bribery for medical test in naval recruitment bribery crime)
सर्दन कमांडच्या मिलिटरी गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित संजू अरलीकट्टी हा भारतीय नौदलाच्या कुलाबा (मुंबई) येथे रुग्णालयात वैद्यकीय खलाशी म्हणून काम करतो. तेथे उमेदवारांच्या लेखी, शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची री-मेडिकल सुरू होती.
त्या वेळी अवाजवी लाभाची मागणी केली. तक्रारदाराच्या वैद्यकीय तपासणीत सकारात्मक वैद्यकीय अहवाल आल्याबद्दल स्वत: आणि इच्छुकांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांपैकी एकाला फोन पेद्वारे ३० हजार रुपये त्याने घेतले.
तसेच भरतीला आलेल्याकडून घेतलेले पैसे फोन पेवर २० हजार रुपये त्याच्या निवासस्थानाच्या झडतीत आढळले. संशयित संजू अरलीकट्टी याला अटक झाली असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांची भूमिका शोधण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.