Nashik Bribe Crime: अधरवडचा लाचखोर ग्रामसेवक गजाआड; घरकुलासाठी मागितले 5 हजार रुपये

Bribe Crime
Bribe Crimeesakal
Updated on

Nashik Bribe Crime : रमाई घरकुल आवास योजनेसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी आणि त्यासाठी शासनाकडून मिळणारे हप्त विनाअडथळा खात्यावर जमा करण्यासाठी बक्षिसी म्हणून पाच हजारांची लाच स्वीकारताना अधरवड (ता. इगतपुरी)च्या ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली.

सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. (bribery gram Sevak Gajaad of Adharwad Asking 5 thousand rupees for gharkul scheme Nashik Crime news)

हंसराज श्रावण बंजारा (५२) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. बंजारा हा इगतपुरी तालुक्यातील अधरवड ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यकत आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावाचे रमाई घरकुल आवास योजनेसाठी प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करून घरकुलाची मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून, तसेच यापुढेही घरकुलासाठी शासनाकडून मिळणाऱ्या रकमेचे हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर लवकर जमा करण्यासाठी बंजारा याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bribe Crime
Crime News : वहिनी, तुम्ही आवडता म्हणत केला विनयभंग

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पथकाने शहानिशा केली. त्यातील सत्यतेनंतर पथकाने सापळा रचून पाच हजार रुपये पंच, साक्षीदारासमक्ष स्वीकारली असता अटक केली.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, नितिन कराड, परशुराम जाधव यांनी बजावली.

Bribe Crime
Crime news : जेवणाच्या पार्टीमध्ये मटण जास्त घेण्याच्या कारणावरून केला मित्राचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.