Nashik News : आश्रमशाळेच्या लाचखोराला अटक

Bribe case
Bribe case sakal
Updated on

नाशिक : मुरंबी (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेला पाण्याच्या टँकरची ट्रीपसाठी आदेश काढून देण्याच्या मोबदल्यात २० हजारांची लाच स्वीकारताना लाचखोर अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. (Bribery superintendent of Murambi ashram school jailed nashik news)

विवेक मधुकर शिंदे (वय ४२) असे त्याचे नाव असून, हरसुल पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भातील तक्रारीनुसार लाचखोर शिंदे याने आश्रमशाळेला पाणीपुरवठ्यासंदर्भात आदिवासी विकास भवन येथून तक्रारदाराच्या नावे आदेश काढून देण्याच्या मोबदल्यात गेल्या २२ फेब्रुवारीस २० हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्यावर संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता, शिंदे याने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Bribe case
Nashik News : सिन्नर -शिर्डी महामार्गावरील पिंपरवाडी टोल प्लाझावर आजपासून टोलवसुली

याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. ६) गुन्हा दाखल करण्यात येऊन शिंदे यास अटक करण्यात आली आहे.

विभागीय अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरूड यांनी ही कारवाई केली.

Bribe case
MBA CET Exam : वंचित विद्यार्थ्यांना पुन्हा देता येणार 'या' तारखेला एमबीएची सीईटी परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()