Nashik Fraud Crime: वराला अडीच लाखाचा गंडा घालत नववधू गायब! दागिन्यांसह घरातील पैशांची केली चोरी

fraud bride news
fraud bride newsesakal
Updated on

Nashik Fraud Crime : कसमादे परिसरात शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी तरुणांना वधू मिळणे दुरापास्त झाले आहे. नववधू नोकरदार वराचे स्वप्न पाहतात. त्यातच मुलींची संख्याही घटली आहे.

त्याचा परिणाम म्हणून कसमादे परिसरात आर्थिक जमापूंजी असलेले संभाव्य वर तरुण पैसे देऊन वधू आणत आहेत. यातूनच फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत.

दाभाडी येथील वराची अशाच पध्दतीने फसवणूक झाली होती. यावेळी नववधू ८० हजाराचे दागिने व घराच्या कपाटातील दहा हजार रुपये चोरुन फरार झाली. (bride disappeared while paying two half lakhs to groom Stealing money from house along with jewellery nashik fraud crime)

पंकज कापडणीस (वय ३१, रा. दाभाडी) या तरुणाची विलास भालेराव (रा. सावरगाव, ता. येवला), संदीप माळेकर (रा. नाशिक) यांनी अन्य दोघा सहकाऱ्यांसह मयुरी चव्हाण (रा. नाशिक) या नववधूसह संगनमताने पंकजशी मयूरीचा विवाह लावून दिला.

त्या मोबदल्यात पंकजकडून अडीच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. पंकजने लग्नात मयूरीला केलेले ऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच त्याने कपाटात ठेवलेले दहा हजार रुपये चोरी करून नववधू फरार झाली.

मयुरीने नातेवाइकांसह अन्य लोकांची टोळी करून कट रचून फसवणूक केली. तिने दुसऱ्या ठिकाणी लग्न केल्याचीही माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fraud bride news
Jalgaon Crime News : महिलेवर अत्याचार करणाऱ्यास 7 वर्षे सश्रम कारावास

तालुका पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दसाणे येथे फसवणुकीचा हा प्रकार घडला. पंकज कापडणीस यांच्या तक्रारीवरुन मयुरीसह पाच संशयितांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिरीक्षक तुषार भदाणे तपास करीत आहेत. तालुक्यात यापुर्वी असे चार ते पाच प्रकार घडले आहेत. त्याशिवाय बदनामीच्या धाकाने फसवणूक झालेल्या काही तरुणांनी तक्रारही नोंदविलेली नाही.

"तालुका भागात लग्नाच्या निमित्ताने फसवणुकीचे असे प्रकार सातत्याने होत आहेत. विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण व त्याच्या नातेवाईकांनी नात्यातील व परिचयातील तरुणीशी विवाह करणे योग्य आहे. जवळच्या नात्यात विवाह संबंध न झाल्यास पर भागात अथवा रक्कम देवून विवाह करताना नववधू तरुणीची संपूर्ण माहिती, तिचे नातेवाईक, आप्तेष्ट, कायमस्वरुपी राहण्याचे ठिकाण, मुळ ओळख या सर्व बाबींची खातरजमा करुनच विवाह करावा. या पद्धतीने फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधावा."

- रवींद्र मगर, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे

fraud bride news
Belgaum Crime : मतभेदामुळं जवानाच्या पत्नीची सात वर्षांच्या चिमुरडीसह गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.