सरस्वती नदीतील जीवघेणा प्रवास थांबला; नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू

Citizens traveling on bridge over Saraswati river in Padkives area before & after
Citizens traveling on bridge over Saraswati river in Padkives area before & afteresakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी अपना गॅरेज झोपडपट्टीच्या पाठीमागील पडकीवेस भागातील पुलाची परिस्थिती पाहिल्यानंतर व नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहून स्वखर्चातून या ठिकाणी तातडीने लोखंडी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. (bridge constructed over Saraswati river Nashik Latest Marathi News)

Citizens traveling on bridge over Saraswati river in Padkives area before & after
Nashik Crime : 75 लाखांचे विदेशी मद्य पाडळी शिवारातून जप्त

शनिवारी (ता. ३) रात्री पडकीवेस भागात तातडीने या पुलाची उभारणी करण्यात आली. रविवारी सकाळपासून नागरिकांनी या पुलावरून प्रवास सुरू केला. माजी आमदार वाजे यांनी वेळीच नागरिकांची गैरसोय व जीवघेणा प्रवास लक्षात घेऊन शासकीय निधीची वाट न पाहता तातडीने स्वखर्चातून पुलाची उभारणी करून नागरिकांची गैरसोय दूर केल्याने समाधान व्यक्त होत आहे. उदय गोळेसर, बाळासाहेब शिंदे, अवधूत आव्हाड यांनी घटनास्थळी उभे राहून या पुलाचे काम पूर्ण करून घेतले व नागरिकांची सोय केली.

दरम्यान, ढगफुटीसदृश्य पावसाने सिन्नर तालुक्यात हाहाकार उडाला होता. या पावसामुळे अनेक कुटुंबे, दुकानांचे नुकसान झाले आहे. रात्री सरस्वती नदीला आलेल्या महापुरामुळे सिन्नर शहरातील रस्त्यांना तलावांचे स्वरूप आले होते. पडकीवेस भागातील पूल अक्षरशः वाहून गेला होता.

यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. या भागातील नागरिकांवर अतिशय मोठ्या अंतरावरून वळसा मारून जाण्याची वेळ आली होती. काही पादचारी दूरवरून जाण्यापेक्षा एकमेकांचा हात हातात धरून जीव धोक्यात घालून सरस्वती नदीपात्रातून रस्ता ओलांडत होते.

Citizens traveling on bridge over Saraswati river in Padkives area before & after
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.