Nashik News : समृद्धी महामार्गावरील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी दरम्यान पुलाचा स्लॅब कोसळला

Collapsed part of newly constructed bridge
Collapsed part of newly constructed bridgeesakal
Updated on

Nashik News : इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना कामाचा दर्जा घसरत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान समृद्धी महामार्गलगत बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी दरम्यान पुलाचे काम सुरू आहे.

सोमवारी ( ता. ८) सायंकाळी साडे सहा वाजता या पुलाचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात घबराट पसरली, या पुलाखालून सध्या टाकेद व परिसरात जाणाऱ्या येणार्याची पायपीट व वाहनांची ये जा सुरू असते. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Bridge slab collapsed between Belgaum Tarhale and Gangadwadi on Samriddhi Highway Nashik News)

घटना घडली दरम्यान समृद्धीचे काम करणाऱ्या या कंपनीने कोसळलेला स्लॅबचा भराव तात्काळ निकामी करून मलबा हलविण्याचा कामाला सुरुवात केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. जिव्हीपीआर या कंपनीला या भागातील रस्ता व पुलाचे काम देण्यात आल्याची माहिती आहे

उदघाटन करण्यासाठी समृद्धीच्या कामाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी घाईगर्दीने काम उरकले जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. हा पूल उभा राहिला असताना अद्याप त्यावर कोणतीही वाहतूक नसताना पुलाचा स्लॅब पत्यासारखा कोसळला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Collapsed part of newly constructed bridge
Sharad Pawar : सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील माणसांत रुजलेत

परिसरात याबाबतचा आवाज होताच बेलगाव तऱ्हाळे व गांगडवाडी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन झालेल्या नुकसानीबद्दल खेद व्यक्त केला.

अद्याप पुलावरून वाहतूक सुरू नसतानाच स्लॅब कोसळला मग पुलावरून वाहतूक सुरू असती तर किती मोठी दुर्घटना घडली असता याचा विचार न केलेला बरा असा गंभीर प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करतात. या दर्जाहीन व निकृष्ट कामाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.

Collapsed part of newly constructed bridge
Daund Crime : गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.