भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

Brother Sister
Brother SisterSakal
Updated on

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : बहीण - भावाच्या नात्याचा ओलावा कायम टिकून रहावा म्हणून भारतीय संस्कृतीत भाऊबीज, रक्षाबंधन या सणांच्या माध्यमातून बहिण-भावाचं नातं जोपासलं जातं. मात्र यापलीकडे जाऊन स्वतःच्या जीवावर उदार होत तीन बहिणींच्या पाठी असलेल्या लहान भावाने मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजत असलेल्या आपल्या थोरल्या बहिणीचा जीव वाचवला. भावाच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (brother saved his sister's life by donating a liver)

स्वतःच्या जीवावर उदार होत, जिवाचा धोका पत्कारुन भावाने यकृत (liver) दान करत बहिणीला जीवदान दिल्याच्या या घटनेने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. भावाने बहिणीला नवं जिवन दिलं, इतकचं नाही तर आर्थिक मदत सुद्धा केली आहे, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तसेच जिल्ह्यात हा एकच चर्चेचा विषय बनला आहे. स्वतःच्या जिविताचा धोका पत्कारत बहिणीसाठी स्वतःचा जीव पणाला लावणारा असा जिगरबाज भाऊ असणे दुर्मिळच!

धनंजय काकुळते (वय ३५) यांनी आपल्याहून मोठी असणारी विवाहित बहिण सुनिता सावकार यांच्यासाठी यकृत दान करून त्यांना पुनर्जन्म दिला. काकुळते यांची मोठी बहीण जोरण (ता. बागलाण) येथे विवाह झाला आहे, मात्र काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, नाशिक येथील डॉक्टरांनी तात्काळ मुंबईत हलविण्यास सांगितले त्यानंतर नातलग व कुटुंबीयांनी त्वरित मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी सुनीता सावकार यांचे यकृत काविळमुळे निकामी झाल्याचे व त्यांच्या जीवितास धोका असल्याचे सांगितले. यकृतासाठी तात्काळ डोनर मिळणे व यकृत मिळणे कठीण झाले होते. यकृतासाठी उशीर होत असल्याने त्यांच्या जीवितास धोका वाढत होता, अशा संकटाच्या वेळी भाऊ धनंजय काकुळते यांनी मी माझ्या बहिणीला यकृत दान करून तिचा जीव वाचवेन असा अट्टाहास धरला.

Brother Sister
नाशिककरांसाठी चामरलेणी परिसर ठरतोय ‘विकेंड डेस्टिनेशन’

मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी यावर निर्णय घेतला व धनंजय काकुळतेंच्या कुटुंबीयांची संमती घेऊन डॉ. प्रशांत रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली ४० तज्ञ सर्जन डॉक्टरांच्या मदतीने सलग १२ तास धनंजय व सुनीता या दोघांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन्ही शस्त्रक्रिया उत्तम रित्या पार पडले असून बहीण सुनीता यांच्या जिवितास धोका टळला, आज दोघांची प्रकृती स्थिर आहे.

तिन बहिनींना एकुलता एक भाऊ असणाऱ्या धनंजय काकुळतेला दोन मुली आहेत. लहान मुलगी तर केवळ दोन महिने वयाची आहे. धनंजयच्या जीवाला धोका आहे असे डॉक्टरांनी नमूद केल्यानंतरही त्यांच्या पत्नी निलिमा काकुळते यांनीही कोणताही विरोध न करता शस्त्रक्रियेस व यकृत दानास परवानगी दिली. धनंजय काकुळते कुटुंबीयांनी उचललेल्या या खंबीर पावलाबद्दल परिसरात व जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सध्या जिल्ह्यात व तालुक्यात एक आदर्श गावातील आदर्श भाऊ-बहिणीच्या ऋणानुबंधाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Brother Sister
SSC Result 2021 : नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्‍के

"माझ्या बहिणीचा जीविताचा धोका लक्षात घेता तिला त्वरीत यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे बनले होते, जितका वेळ जास्त जाईल तेवढा धोका अधिक होता म्हणून मी माझा वैयक्तिक कोणताही विचार न करता बहिणीला जीवनदान देणे हे माझे कर्तव्य होते म्हणून मी एक यकृत दानाचा निर्णय घेतला व माझ्या बहिणीचा मी एकुलता एक भाऊ असल्याने ते माझे कर्तव्य होते असे मी समजतो." - धनंजय काकुळते, यकृत दाता

"माझा एकुलता एक भाऊ असल्याने माझ्या आई वडिलांनी तो नवसाने मागितला आहे, त्याच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्याचा जीव धोक्यात घालणे मला पटत नव्हते पण मात्र त्याच्या हट्टी स्वभावामुळे त्याने मला त्याचे यकृतदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे मी आज एक नवं जग पाहत आहे व माझा पुनर्जन्म झाला. माझ्या भावाने मला आयुष्यभराची भाऊबीज दिली. मला असा भाऊ मिळणे मी माझे भाग्यच समजते. त्याचे उपकार माझ्याकडून कधीच फेडले जाणार नाहीत. - सुनिता सावकार, यकृत प्रत्यारोपण रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.