Kharif Season : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार राज्यातील यंदाच्या खरीप हंगामासाठी ७५ हजार टन रासायनिक खतांचा ‘बफर स्टॉक’ करण्यात येत आहे. त्यात युरिया ५० हजार अन डीएपी २५ हजार टन असेल.
त्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन, दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनची सरकारने ‘नोडल एजन्सी’ म्हणून निवड केली आहे. (buffer stock of 75 thousand tons of chemical fertilizers in state for Kharif nashik news)
‘बफर स्टॉक’ साठी ‘नोडल एजन्सी’ निहाय युरिया आणि डीएपीचा निश्चित करण्यात आलेला कोटा अनुक्रमे असे : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ-३५ हजार टन-१७ हजार ५०० टन, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन-१० हजार टन-५ हजार टन,
दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन-५ हजार टन-अडीच हजार टन. राज्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे व वेळेवर खते उपलब्ध व्हावीत म्हणून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत हा साठा करण्यात येईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
युरिआचा टनाचा दर ५ हजार ८८९ रुपये, तर डीएपीचा टनाचा दर २६ हजार ८०० रुपये असा राहील. युरिया साठी टनाला १ हजार ३६२ आणि डीएपीसाठी २ हजार ५६६ रुपये खर्च ग्रहीत धरण्यात आला आहे. त्यात उतराई, भराई, ५ महिन्यांसाठी गुदाम भाडे, दुय्यम वाहतूक, कर्जावरील बँकेचे ५ महिन्यांसाठी व्याज, सेवा शुल्क, ५ महिन्यांचा विमा खर्च समाविष्ट आहे.
तीनही संस्थांना संरक्षित साठ्यासाठी खताची किंमत आगाऊ भरावी लागणार आहे. सर्व गावांमध्ये खते उपलब्ध होण्यासाठी साठ्यासाठी गुदामांच्या संख्येत वाढ करायची आहे. मंडल मुख्यालय आणि बाजारांच्या मोठ्या गावांमध्ये साठ्यासाठी गुदाम उपलब्ध करायचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.