Builder Association Protest : ‘बांधकाम’कडे साडेपाच हजार कोटी थकीत; गुरुवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

Builder Association Protest : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कंत्राटदारांचे पाच हजार २०० कोटी रुपये थकीत असल्याने त्यांनी पुन्हा कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Builder Association of india
Builder Association of indiaesakal
Updated on

Builder Association Protest : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कंत्राटदारांचे पाच हजार २०० कोटी रुपये थकीत असल्याने त्यांनी पुन्हा कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने येत्या गुरुवार (ता. २७) पासून आंदोलनाचा इशारा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संघटनेतर्फे पत्र दिले आहे. त्यानुसार मार्च २०२२ ते मार्च २०२४ या दोन वर्षांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कंत्राटदारांचे पाच हजार २०० कोटी रुपये थकीत आहेत. (Builders Association Protest due to Five thousand crore in arrears )

तसेच, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे ९५० कोटी रुपये काम पूर्ण होऊनही कंत्राटदारांना मिळालेले नाही. अशा परिस्थितीत कंत्राटदार काम करण्यास उत्सुक नसतो आणि कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. परिणामी, शासनाच्या वेळेचा आणि पैशांचाही अपव्यय होतो. कंत्राटदारांनी कर्ज घेऊन कामे पूर्ण केली आहेत. त्यांना वेळेवर पैसे न मिळाल्याने अनेकांची बँक खाती ‘एनपीए’मध्ये गेली.

शासनाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर बिल वेळेवर मिळत नाही. परिणामी, उशिरा बिले अदा करण्याचे दुष्टचक्र सुरू होते. नाशिक जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५८६ कोटी रुपये थकीत आहेत. त्यासाठी कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलनही केले होते. आता पुन्हा गुरुवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंदियाचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी दिला आहे. (latest marathi news)

Builder Association of india
Nashik News : गोदावरी उपसा जलसिंचन संस्थेच्या कर्जमाफीबद्दल दुजाभाव! शेतकऱ्यांत रोष

...म्हणून पैसे मिळेना

राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १९ हजार ८०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र, या विभागाने ४२ हजार कोटींच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला. त्यानंतर पुरवणी मागण्यांमध्येही हात आखडता न घेता १८ हजार कोटींची कामे वाढवली. त्यामुळे एकूण ६० हजार कोटींची कामे मंजूर झालेली असताना त्यासाठी निधी येणार कसा, असा प्रश्‍न बिल्डर्स असोसिएशनतर्फे उपस्थित करण्यात आला. या कारणामुळे कंत्राटदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील विभागनिहाय थकीत रक्कम

मालेगाव विभाग- १३४ कोटी १३ लाख रु.

नाशिक पूर्व- १०३ कोटी १३ लाख रु.

सा. बां. कळवण- ७० कोटी ८९ लाख रु.

नाशिक उत्तर- ८५ कोटी ५ लाख रु.

सा. बां. नाशिक- १८८ कोटी ९३ लाख रु.

एकूण- ५८६ कोटी रुपये

Builder Association of india
Nashik Police : पोलिस आयुक्तांकडून निरीक्षकांची कानउघाडणी! प्रतिबंधात्मक कारवाई न करणाऱ्यांना सज्जड इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.