Nashik News : इमारत पुनर्विकासाची संधी नाशिकमध्येही उपलब्ध : फय्याज मुलाणी

Dignitaries at the lighting of the building redevelopment seminar organized by B Orbit Group
Dignitaries at the lighting of the building redevelopment seminar organized by B Orbit Groupesakal
Updated on

Nashik News : शहरातील प्रमुख रस्त्यालगत जुन्या इमारती पाडून नव्याने इमारती उभ्या राहत आहेत; परंतु याबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र, आता पुणे, मुंबईसारखीच नाशिकमध्येही इमारत पुनर्विकासाची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी रविवारी (ता. ३) दिली.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकारी गृहनिर्माण व अपार्टमेंट्स संस्थांचा महासंघ बी ऑर्बिट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा हॉलमध्ये एकदिवसीय चर्चासत्र झाले. (Building redevelopment opportunity also available in Nashik news)

या वेळी व्यासपीठावर फय्याज मुलाणी, गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव तोरवणे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सहाय्यक अभियंता समीर रकटे, राजेंद्र पवार, पुणे येथील सोसायटी प्लसचे संजय सूर्यवंशी, बी ऑर्बिट ग्रुपचे अभिषेक बिरारी, अभियंता अमित सानप यांच्यासह बांधकाम व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपप्रज्वलनानंतर महासंघाचे संस्थापक बिरदीचंद नहार यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. ॲड. तोरवणे यांनी मुलाणी यांचा, तर श्री. सूर्यवंशी यांनी श्री. पवार यांचा सत्कार केला. संजय अग्रवाल, समीर रकटे, श्री. सूर्यवंशी यांचा सत्कार श्री. बिरारी यांनी केला. मधुकर फटांगरे यांनी श्री. बिरारी यांचा सत्कार केला. ॲड. तोरवणे यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या आयोजनामागील हेतू विशद केला. श्री. बिरारी यांनी प्रायोजकांच्या परिचयाबरोबरच कार्यक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dignitaries at the lighting of the building redevelopment seminar organized by B Orbit Group
Nashik Onion News : कांदा साठवण क्षमता 50 हजार टनांनी वाढणार; कांदा चाळ उभारण्याच्या 27 प्रस्तावांना मंजुरी

इमारत पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करताना श्री. सूर्यवंशी यांनी पुनर्विकासासाठी आवश्‍यक सभासद संख्या, त्याबाबतची बांधकाम नियमावली, निविदा, इमारत नूतनीकरण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचा आर्थिक ताळेबंद या बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

बांधकाम परवानगीबाबत श्री. रकटे यांनी मार्गदर्शन करताना संबंधितांचे सातबारा उताऱ्यावर नाव असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. एखाद्या इमारतीचे कम्प्लिशन नसेल, मात्र घरपट्टी लागू झाली असल्यास अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी ३० टक्के वाढीव एफएसआय मोफत मिळेल, असे सांगितले.

अमित सानप यांनी, प्रमुख मार्गांवरील जुन्या इमारती पाडून नव्या इमारती उभ्या राहत आहेत; परंतु याबाबत अनेकांना माहिती नसल्याचे सांगून वास्तविकता अहवाल महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

Dignitaries at the lighting of the building redevelopment seminar organized by B Orbit Group
PM Vishwakarma Yojana : 12 बलुतेदारांना कमी दराने व्यावसायिक कर्ज; जाणून घ्या सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()