Nashik News : मौजे सुकेणेतील बैलगाडा पश्चिम महाराष्ट्रात प्रथम!

मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील रावसाहेब पाटील मोगल यांच्या गुरु बैलाने लोणंद येथील फाजीलराव बैलासोबत गुरसाळे गावातील प्रभाकर केसरीचे पहिले पर्व जिंकले.
Raosaheb Patil Mogul's pair of guru bullocks.
Raosaheb Patil Mogul's pair of guru bullocks.esakal
Updated on

कसबे सुकेणे : मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील रावसाहेब पाटील मोगल यांच्या गुरु बैलाने लोणंद येथील फाजीलराव बैलासोबत गुरसाळे गावातील प्रभाकर केसरीचे पहिले पर्व जिंकले.

दहा गाड्यांच्या ४५ शर्यतींमध्ये अव्वल येत प्रभाकर केसरीचा किताब मिळविला. तब्बल तीन लाख, तीन हजारांचे पहिले बक्षीस पटकावले. (Bullock cart in Mauje Sukene first in West Maharashtra Nashik News)

Raosaheb Patil Mogul's pair of guru bullocks.
Inspiring Story : वाणिज्य शाखेचे ज्ञान नसतानाही सीए परीक्षा उत्तीर्ण

गाडामालक रावसाहेब मोगल व कपिल मोगल स्पर्धेसाठी उपस्थित होते. यापूर्वीही रावसाहेब मोगल यांच्या गुरु बैलाने अनेक स्पर्धा जिंकत पारितोषिके पटकावली आहेत. मागील वर्षी पुण्याजवळील स्पर्धेत त्यांनी जेसीपीसह इतर अनेक बक्षिसे जिंकली आहेत.

आता पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात ही मोठी कामगिरी केली आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर या ठिकाणी मोठा जल्लोष झाला. मौजे सुकेणे ग्रामस्थांनीही आनंद केला. दोन महिन्यांतच पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या तीन मोठ्या बैलगाडा शर्यतीत गुरू बैल अपराजित राहिला आहे.

खटाव तालुक्यात त्याने आपला दबदबा कायम ठेवला, असे रावसाहेब पाटील मोगल यांनी सांगितले. रावसाहेब पाटील यांचा गुरू बैल म्हणजे गावाची शान आहे. या बैलाने विविध बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून मौजे सुकेणे गावाचे नाव राज्यभर पोहोचविले आहे, असे डी बी मोगल यांनी सांगितले.

Raosaheb Patil Mogul's pair of guru bullocks.
Kunbi Certificate: सिन्नरला 54 कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण; अध्यादेशानंतर कार्यवाहीला वेग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.