NMC News : महापालिका कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा झाल्याने दिवाळी खरेदीला जोर येणार आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीवर मात्र दहा कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
कायम अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी, मानधनावरील ५८०० कर्मचाऱ्यांना १७ हजार रुपये, तर अनुदानित ६८५ कर्मचाऱ्यांना साडेआठ हजार रुपये अनुदान खात्यावर जमा करण्यात आले. (burden of 10 crores on NMC Concessionary grant amount credited to employees account nashik)
महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा दीपावली सानुग्रह अनुदान दीड हजार रुपयांनी वाढवून देण्यात आले. मागील वर्षी साडेपंधरा हजार रुपये, तर या वर्षी सतरा हजार रुपये अनुदान घोषित करण्यात आले होते.
स्थायी पदावरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, मुख्य अंगणवाडीसेविका, सेविका आणि मदतनीस, अंशकालीन शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी,
एनयूएचएम, एनयूएलएम कर्मचारी, क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईनुसार २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली होती.
परंतु लेखा विभागाच्या अहवालानुसार फेटाळण्यात आली. महापालिका प्रशासनाने पाच हजार ८०० कायम, मानधनावरील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १७ हजार रुपये, तर शासन अनुदानातून मानधन घेणाऱ्या क्षयरोग नियंत्रण, हिवताप व एड्स नियंत्रण सोसायटी,
बूस्टर पंपिंग स्टेशन, समग्र शिक्षा अभियान, एनयूएचएम, एनयूएलएम, आशा कर्मचारी, युनिसेफ अशा सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत असलेल्या, शासन अनुदानातून नियमित वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांनाही साडे आठ हजार रुपये अनुदानाची घोषणा केली.
अनुदानाची रक्कम बँक खात्यांवर जमा करण्यात आली. सानुग्रह अनुदानासाठी अंदाजपत्रकात १२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. अनुदान वर्ग करण्यात आल्याने जवळपास दहा कोटींचा बोजा पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.