NMC News : विद्युतदाहिन्यांचा भार महापालिकेवर!

लाकूड जाळल्याने प्रदूषण होत असल्याचे कारण देत स्मार्टसिटी कंपनीने पर्यावरणपूरक दोन विद्युत शवदाहिन्या खरेदी करण्यात आल्या.
electric crematorium File Photo
electric crematorium File Photoesakal
Updated on

नाशिक : पूर्व विभागातील अमरधामकरीता स्मार्टसिटी कंपनीकडून दोन विद्युतदाहिनी तयार करण्यात आली, परंतु खरेदीनंतर हमी कालावधी संपुष्टात आल्यानंतर देखभाल दुरुस्ती व संचलनाची जबाबदारी स्मार्ट कंपनीने विद्युतदाहिन्या महापालिकेकडे सोपविल्याने आगामी पाच वर्षांसाठी विद्युत दाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचा अडीच कोटींचा खर्च महापालिकेला सोसावा लागणार आहे. (burden of electric crematorium on municipal corporation NMC News nashik)

लाकूड जाळल्याने प्रदूषण होत असल्याचे कारण देत स्मार्टसिटी कंपनीने पर्यावरणपूरक दोन विद्युत शवदाहिन्या खरेदी करण्यात आल्या. पूर्व विभागातील अमरधाममध्ये या दोन्ही विद्युतदाहीन्या कार्यरत आहेत.

कंपनीने दोन विद्युतदाहिनीसाठी अनुक्रमे तीन व पाच वर्षे संचलन व देखभाल दुरुस्तीचा भार उचलला. २९ जुलै २०२३ व ३० सप्टेंबर २०२३ रोजी दोन्ही दाहिन्यांची संपुष्टात आली. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीने या दोन्ही विद्युत दाहिन्यांचे हस्तांतर महापालिकेकडे केले.

electric crematorium File Photo
NMC Flower Festival : नाशिक महानगरपालिकेच्या ‘पुष्पोत्सव’ आयोजनास हिरवा कंदील!

त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा भार देखील महापालिकेला सोसावा लागणार आहे. मूळ उत्पादक कंपनीकडून पाच वर्षे संचलन व देखभाल-दुरुस्तीसाठी दर मागवून २.३७ कोटींचे प्राकलन तयार करण्यात आले.

महासभेत जादा विषयात मंजुरी देण्यात आली. दोन्ही विद्युत दाहिन्या संचलनाची जबाबदारी आरोग्य व विद्युत विभागाकडे देण्यात आली.

electric crematorium File Photo
Phule University Exam : परीक्षा चौथ्या सत्राची, प्रश्‍नपत्रिका दिली तिसऱ्या सत्राची; तासाभरानंतर चुकीची दुरुस्‍ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.