Nashik Crime News : सिन्नरमध्ये चोऱ्यांचे सत्र थांबेना! नांदुर-शिंगोटे परिसरात घरफोडी

Burglary in Nandur Shingote area sinnar nashik crime news
Burglary in Nandur Shingote area sinnar nashik crime newsesakal
Updated on

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. नांदुर-शिंगोटे परिसरामध्ये पुन्हा चोरीचा प्रत्यय आला. ४ ते ५ दिवसांपूर्वीच येथील निमोण नाका परिसरातील सरकार मान्य देशी दारूचे दुकान फोडून तब्बल दीड लाख रुपये किमतीचे दारू चोरट्यांनी पसार केली.

नांदुर-शिंगोटे येथील नाशिक पुणे हायवे लगत असलेल्या गट क्रमांक ३७० या ठिकाणी सुभाष नारायण कराड यांचा बंगला आहे. ते मुंबई येथे स्थायिक असून त्यांच्या बंगल्याला चोरट्यांनी काल रात्री लक्ष केले. (Burglary in Nandur Shingote area sinnar nashik crime news)

बंगल्याचा मुख्य दरवाजा चोरट्यांनी कटवणीच्या साह्याने तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाट तोडून कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या व कपाटामधील रक्कम चोरट्यांनी चोरुन पोबारा केला. सदरच्या चोरट्यांनी नांदूर शिंगोटे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचे सत्र सुरू असल्यामुळे वाढीवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कराड यांनी आपल्या बंगल्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असून सदरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री आठ वाजता कराड यांना आपल्या बंगल्याच्या आसपास कोणीतरी फिरताना दिसले व त्यानंतर रात्री बारा वाजेच्या दरम्यान नाशिक पुणे हायवेच्या बाजूने चोरट्यांनी आत प्रवेश करून बाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तोडून टाकला.

त्यानंतर मुख्य दरवाजाला त्यांनी लक्ष बनवून कडी कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी घरातील किचन मधील सामान असताव्यस्त फेकले. दुसरा दरवाजा तोडून त्यामधील कपाट तोडून कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून कशी मूल्यवान वस्तू मिळेल या आशेने त्यांनी कपाट पूर्ण तोडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Burglary in Nandur Shingote area sinnar nashik crime news
Nashik Crime: परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 7 लाखांना गंडा; स्वस्तात विमान प्रवासाचे तिकिटाचे दाखविले आमिष

मात्र कपाटामध्ये एक हजार रुपयांच्यावर कुठलीही रक्कम ठेवलेली नसल्याचे कराड यांनी दूरध्वनीवरून कळविले सदरचा प्रकार कराड यांना मुंबईला समजल्यानंतर त्यांनी मुंबई येथून गावाकडे येण्यासाठी धाव घेतली.

या सर्व गोष्टीची खबर नांदूर पोलिसांना समजताच नांदूर पोलिसांनी जागेवर जाऊन सर्व पाहणी केली व सदरच्या चोरीचा पंचनामा केला असून पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सदरच्या चोरट्यांनी काल रात्री आठ तीस वाजता या परिसरातील राहत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्वच घरांचे दरवाजे ठोकवल्याची बाब सकाळी समोर आली. चोरट्यांनी या परिसरामध्ये चांगली चाचपणी केली आहे. लोक शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड यांचाही बंगला या ठिकाणी असून चोरट्यांनी रात्री २ ते २.३० वाजेदरम्यान भाबड यांच्या किचनच्या पाठीमागील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र दरवाजा भक्कम व आतून कड्या लावलेल्या असल्यामुळे तिथून चोरटे पसार झाले या परिसरामध्ये पोलीस गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी संदीप भाबड यांनी केली आहे

Burglary in Nandur Shingote area sinnar nashik crime news
Nashik Crime: निफाड तालुक्यामध्ये युरिया घोटाळा उघड; स्थानिक गुन्हे शाखेने पकडल्या 500 गोण्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.