24 तासात जैन मंदिर वणी अन् इतर ठिकाणची घरफोडी वणी पोलीसांकडुन उघड

thieves arrested
thieves arrestedesakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : वणी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या संभवनाथ जैन मंदिरात २६ जुनच्या रात्री झालेल्या चोरी (Theft) प्रकरणी वणी पोलिसांनी वेगाने तपास करीत २४ तासात तीघा संशयीतांना अटक केली असून संशयीतांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. (burglary of Jain temple wani other places was exposed by Wani police 24 hours Nashik crime news)

वणी गावातील संभवनाथ भगवंत जैन मंदिरात काही अज्ञात चोरट्याने २६ जुनच्या रात्री मंदीरातील पुजाविधी साहित्य कक्षाच्या बंद दरवाज्याचे कडी कोंडा तोडुन मंदिरात ठेवलेले चांदिचे दोन कलश, प्रत्येकी ८,२५०/- रु. किंमतीचे असे एकुण १७,५००/- रु. किमतीचे चांदिचे कलश चोरुन नेले बाबत वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयात पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशन कडील सपोनि स्वप्निल राजपुत, पो. हवा. एच. के. चव्हाण, ए. एम. जाधव, के. व्ही. गांगुर्डे, एस. व्ही. जाधव, व्ही. एस. खांडवी यांनी गुन्हा घडल्याचे ठिकाणाचे आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता सदर गुन्हयात संशयावरुन इसम नामे शकील हुसेन काकर वय १९ वर्षे, सुमित कारभारी गांगुर्डे वय २३ वर्षे, रुतीक संजय गांगुर्डे वय १९ वर्षे सर्व रा. राजवाडा, वणी ता. दिंडोरी जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता.

thieves arrested
नाशिक : माडसांगवीत 375 क्विंटल धान्यसाठा जप्त

त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन सदर गुन्हयातील चोरी केलेले चांदिचे दोन कलश, प्रत्येकी ८,२५०/- रु. किंमतीचे असे एकुण १७,५००/-रु. किमतीचा मुद्देमाल काढुन दिला. त्यांचेकडे अधीक विचारपुस कली असता वणी गावात व परिसरात त्यांनी घरफोड्या व मोटारसायक चोरी केल्याची कबुली देत असुन त्याबाबत अधिक तपास सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. एस. के. चव्हाण हे करीत आहे.

thieves arrested
Nashik : पावणेदोन लाखाचा गुटखा जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.