Nashik Crime News : घरफोडीची 2 दिवसात उकल; उपनगर पोलिसांची कामगिरी

upanagar police station staff
upanagar police station staffesakal
Updated on

नाशिक : जेल रोडच्या गणेश कॉलनीतील घर फोडून साडेपाच लाखांचे दागदागिने व बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल घरफोड्याला दोन दिवसात जेरबंद करण्यात आले. उपनगर पोलिसांनी घरफोडीची दोन दिवसात उकल केली आहे.

किरण रतन पाटील (रा. फर्नांडिस वाडी, जय भवानी रोड, नाशिकरोड), असे संशयिताचे नाव आहे. राहुल संतोष डगळे यांच्या घरी घरफोडी झाली होती. याप्रकरणी तपास सुरू असताना संशयित पाटील याची माहिती उपनगर पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार, पोलिसांनी संशयित पाटील यात ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता, त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. (Burglary solved in 2 days performance of upnagar police Nashik Latest Crime News)

upanagar police station staff
Nashik Crime News : बोटॅनिकल गार्डन पाहणे पडले महागात!

परंतु, पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करीत, त्याच्याकडून घरफोडीतील १६ तोळे सोने व बुलेट हस्तगत केली आहे. किरण पाटील याच्याविरुद्ध अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. उपनगराचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह निरीक्षक भालेराव व पगारे यांनी तपासाधिकारी उपनिरीक्षक एम. वाय. गोळे व लोंढे यांना मार्गदर्शन केले.

आई सहआरोपी

संशयित किरण हा अट्टल घरफोड्या असून, चोरून आणलेले सोन्याचे दागिने तो त्याच्या आईला देत असे. तर, त्याची आईला ते चोरीचे दागिने असल्याचे माहीत असूनही, ती सराफांकडे गहाण ठेवायची. त्यामुळे तिचा या गुन्ह्यातील सहभाग निश्‍चित होत असल्याने सदर गुन्ह्यात संशयित पाटील याच्या आईलाही सहआरोपी करणार असल्याचे उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले.

upanagar police station staff
Nashik : रुग्णवाहिका चालक, डॉक्टरांची हेळसांड; विश्रांतीसाठी रूम देण्यास टाळाटाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.