Crime Update : घरफोडीची 24 तासात उकल

Bhadrakali crime investigation team personnel with the suspect
Bhadrakali crime investigation team personnel with the suspectesakal
Updated on

जुने नाशिक : नानावली परिसरातील घरफोडीची उकल भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून अवघ्या २४ तासात करण्यात आली. संशयितासह चोरी गेलेला मुद्देमाल पथकाकडून हस्तगत करण्यात आला. ललिता वाघ यांच्या घरी चोरी झाली होती. (Burglary solved in 24 hours Nashik Crime Update latest Marathi news)

Bhadrakali crime investigation team personnel with the suspect
शहरातील सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतूस जप्त

बाप्पाची चांदीची मूर्ती, सोन्याचे गोफ, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, साड्या, एटीएम कार्ड, घराचे कागदपत्र, रोटर, मेकअप साहित्य, असा ५४ हजाराचा ऐवज चोरी झाला. वाघ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भद्रकाली गुन्हे शोध पथक घटनेचा तपास करत होते. कर्मचारी सागर निकुंभ, धनंजय हासे यांना संशयित कोळीवाडा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, सागर निकुंभ, धनंजय हासे यांनी संशयित रोहन चौधरी (२३, रा. कोळीवाडा) यास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करून अवघ्या २४ तासात गुन्ह्याची उकल केली आहे.

Bhadrakali crime investigation team personnel with the suspect
गणेशोत्सवाची सातासमुद्रापार कॅलिफोर्नियात धुम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()