Crime Update : बंद घराची संधी साधून पावणे सहा लाखांची घरफोडी

burglary News
burglary Newsesakal
Updated on

नाशिक : वडाळा नाका परिसरातील रेणुकानगर येथील रहिवाशी कुटूंबियांसह परगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून ५ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Burglary worth 6 lakhs taking advantage of closed house at wadala naka nashik Latest Crime News)

burglary News
Gram panchayat Election : भरपावसात 6 तासात 58.74 टक्के मतदान

इकबाल अमीर शेख (रा. रेणुकानगर, वडाळानाका, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, शेख कुटूंबिय गेल्या १४ तारखेला दुपारी दोन वाजता बाहेरगावी गेले होते. ते गेल्या शुक्रवारी (ता.१६) सकाळी दहा वाजता घरी परतले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. शेख कुटूंबिय नसताना अज्ञात चोरट्यांनी फ्लॅट बंद असल्याची संधी साधून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.

यावेळी चोरट्यांनी घरातून तब्बल ५ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेत घरफोडी केली. यामध्ये ३० हजारांची सोन्याची चैन, ६० हजारांची सोन्याची अंगठी, ३० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या, १२ हजार रुपयांच्या सोन्याचे झुबे, ४५ हजारांची सोन्याची चैन, १८ हजारांची सोन्याची नथ, २ लाख १० हजारांचे सोन्याचे नेकलेस, २४ हजारांचे सोन्याचे पॅण्डल, ७० हजारांची सोन्याची पोत, ७० हजारांची चांदीच्या तीन अंगठ्या, ५ हजारांचे स्मार्ट वॉच, दोन हजारांचे चांदीचे पैंजन असा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक गेंगजे हे तपास करीत आहेत.

burglary News
मृतदेहासाठी तिरडी बांधणे एक "अनमोल सामाजिक दायित्व"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()