Maratha Reservation: येवल्यात आज मराठाद्वेषी रावणाचे दहन; आरक्षणासाठी ‘अन्नत्यागा’चा 8 वा दिवस

Protesters participating in food sacrifice movement in Tehsil office premises.
Protesters participating in food sacrifice movement in Tehsil office premises.esakal
Updated on

येवला : आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबासह विविध स्थानिक मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सोमवारी (ता. २३) आठवा दिवस होता. दोघांची प्रकृती बिघडली आहे.

आंदोलनकर्त्यांच्या पुढाकाराने मंगळवारी (ता. २४) विजयादशमीच्या मुहूर्तावर येथील तहसील कार्यालयासमोर मराठाद्वेषी रावणाचे दहन करण्यात येणार आहे. (Burning of Maratha hater leaders Ravana in yeola dasara today 8th day of fasting strike for reservation nashik)

मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने मराठा समाजबांधवांना सरसकट कुणबीमध्ये समाविष्ट करून दाखले द्यावेत, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन संजय सोमासे, निंबा फरताळे, विजय मोरे, जालिंदर मेंढकर, रवींद्र शेळके, गोरख संत गेल्या ३६ दिवसांपासून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करत आहेत.

विशेष म्हणजे आंदोलनाला स्वतः जरांगे पाटील यांनीही भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. या सहा जणांनी आता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जालिंदर मेढकर व रवींद्र शेळके यांची प्रकृती बिघडली आहे.

मात्र, उपचार घेऊन त्यांनी पुन्हा आंदोलनात सहभाग घेतला असून, शासन आरक्षणाचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

तालुका दुष्काळी जाहीर करावा, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे रूंदीकरण करून लाभ क्षेत्रातील बंधारे आरक्षित करावेत, येथील शिवसृष्टीचे काम पूर्ण करावे, राजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा पूर्ववत बसवावा, टोलनाक्यावरील आंदोलक शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घ्यावेत, चिचोंडी येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी, भुयारी गटार योजनेचे काम सुरू करावे आदी स्थानिक मागण्याही त्यांनी केल्या असून, या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी मागणीही केली आहे.

दरम्यान, सोमवारी आंदोलकांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन विजयादशमीनिमित्त येथील तहसील कार्यालयासमोर मराठाद्वेषी रावणाचे दहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी होणार असून, मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Protesters participating in food sacrifice movement in Tehsil office premises.
Maratha Reservation : वातावरण तापलं! चुलीत गेला पक्ष अन् चुलीत गेले नेते; साताऱ्यातील 'या' गावांत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

आज समाजाची होणार बैठक

श्री. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेली मुदत मंगळवारी संपत आहे. तरीही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यानुसार तालुक्याची भूमिका व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी सकाळी अकराला शासकीय विश्रामगृहात बैठक होणार आहे.

येवला चळवळीचे व आंदोलकांचे गाव म्हणून ओळखले जात असून, आजपर्यंत अनेक विषयांसाठी मोठमोठी आंदोलने झाली आहेत व यशस्वीही केले आहेत.

आता समाजासाठी, लेकराबाळांच्या भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी जरांगे- पाटील घेतील त्या भूमिका घेतील त्याला पाठिंबा देण्यासह आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक होणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.

Protesters participating in food sacrifice movement in Tehsil office premises.
Dada Bhuse News: देशातील अमृतवाटिकेत प्रत्येक गावाचे प्रतिबिंब दिसेल : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.