सिन्नर (जि. नाशिक) : देशातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस वे असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाने गुरुवार दि.15 पासून नागपूर ते शिर्डी दरम्यान नॉनस्टाप शयन आसनी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिर्डी येथून शुक्रवारी बसच्या पहिल्या फेरीचे प्रस्थान होणार आहे. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२ किमी व वेळेमध्ये सव्वाचार तास बचत होणार आहे. (Bus service between Nagpur and Shirdi via Samruddhi highway from today Nashik Latest Marathi News)
गुरुवारी दि.१५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकातून तर शुक्रवारी दि. १६ डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता शिर्डीतून या बससेवेचा आरंभ होईल असे राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या बस सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगरच्या विभाग नियंत्रक मनिषा सकपाळ, कोपरगावचे आगार प्रमुख अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
ही बस नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणांहून दररोज रात्री ९ वाजता सुटेल व पहाटे ५.३० वाजता निर्धारित थांब्यावर पोहोचेल. शिर्डी ते नागपूर अंतर ही बस साडेआठ तासांत पार करणार आहे. या बसमध्ये प्रवाशांना २ बाय १ पद्धतीची ३० आसने (पुशबॅक पद्धतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून, १५ शयन आसने (स्लीपर) आहेत. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२ किमी व वेळेमध्ये सव्वाचार तास बचत होणार आहे.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
याबरोबरच परिवहन महामंडळाने नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) व नागपूर ते जालना या मार्गावरही समृद्धी महामार्गावरून शयन आसनी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, औरंगाबाद, जालना या ठिकाणांहून दररोज रात्री १० वाजता बस सुटेल व पहाटे ५.३० वाजता निरधारीत थांब्यावर पोहोचणार आहे.
शिर्डी ते नागपूर प्रवासाकरिता या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १००% मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.