Nashik Fire Accident : येथील बस स्थानकात उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस खाक झाली. सुदैवाने बसमध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी टाळली. मात्र आगीमुळे बसचा केवळ सांगडा उरला.
बसमधील बॅटरी व शॉर्टसर्किटने वायरिंग पेटल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (bus to Nandgaon burn in fire nashik fire accident news)
येथील आगाराची बस (एमएच ०७ सी ९३३७) ही विद्यार्थी ने-आण करण्यासाठी वापरली जाते. शनिवार असल्याने कारणामुळे शाळा लवकर सुटल्याने या बसला चाळीसगावला पाठविण्यात आले होते. चाळीसगावहून बस पुन्हा नांदगाव येथे प्रवासी घेऊन आली असता चालक ज्ञानेश्वर थोरे हे सर्व प्रवासी उतरल्यानंतर अहवाल करण्यासाठी वाहक अरविंद ताडगे यांच्यासह आगारात गेले.
आगाराकडे जात असतानाच अवघ्या काही क्षणातच बसमधून धुरासह आगीचे लोळ बाहेर पडू लागले आणि काही मिनिटातच आगीने पेट घेतला. यावेळी ज्ञानेश्वर थोरे यांनी सदरची बस हे फलाटवर न लावता स्थानकात दूर लावली होती. त्यामुळे इतर वाहनांना धोका पोचला नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बसला आग लागल्याचे कळताच अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आगारातील अग्निशमन यंत्रे आणून कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. याचदरम्यान पाण्याचा टँकर आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीच बस पूर्णपणे खाक झाली. यामुळे केवळ बसचा सांगाडा उरला.
दीड तासांनी अग्निशमन दल घटनास्थळी
बसला आग लागल्याची माहिती आगारप्रमुख विश्वास गावित यांनी नांदगाव, मनमाड, येथील अग्निशमन विभागाला दिली. नांदगाव अग्नीशमन विभागाकडे वाहन नसल्याने त्यांच्याकडे मनमाडच्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागले. दीड तासाने मनमाडचे अग्निशमन दल घटनास्थळी आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.