जुने नाशिक : दीपावलीच्या आगमनाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्साह बघता यंदाची दीपावली खरेदीदेखील समाधानकारक असेल. अशी आशा व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. दोन वर्षाचे नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे. शनिवार (ता.२२) पासून दीपावली सुरू होणार आहे. (Businessman view of 2 year loss recovery potential during diwali 2022 Nashik Latest Marathi News)
दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे दीपावली साध्या पद्धतीने साजरी झाली. यंदा दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय दिवाळीमुळे वेतन लवकर होणार आहे. काही शासकीय विभागांना बोनस मिळाला आहे. फेस्टिवल अलाउन्स तसेच सातवा वेतन आयोगाचा फरक मिळाल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थितीदेखील बळकट आहे.
त्यामुळे या वर्षी खरेदीचा जोर जास्त असणार आहे. या संदर्भात व्यावसायिकांशी संपर्क साधला असता, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिवाळीत कपडे, सोने, घरगुती इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासह अन्य विविध खरेदीकडे नागरिकांचा चांगला कल आहे. येत्या दिवसांमध्ये बाजारपेठ गजबजणार शक्यता व्यक्त केली आहे.
ऑनलाइन खरेदी सुविधेवर नाराजी
ऑनलाइन खरेदी सुविधेमुळे काहीसा परिणाम होणार असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. ऑनलाइन घरपोच सुविधा मिळत असल्याने बहुतांशी नागरिक ऑनलाइन खरेदी करत आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या घटली असल्याचेही त्यांनी सांगितले.
"यंदाची दीपावली उत्साहवर्धक आहे. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सरासरी दर स्थिर आहे. गेले दोन वर्ष लक्षात घेता यंदा समाधानकारक कपड्यांची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे." - संजय निकम, कपडे व्यावसायिक
"दोन वर्षानंतर दीपावली उत्साहात साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने नागरिक आतापासूनच खरेदीस बाहेर पडली आहे. दिवाळीची बाजारपेठ चांगली राहणार आहे. त्यामुळे दुकानात अधिक माल भरून ठेवला आहे." - बंडू गंगावणे, रेडीमेड गारमेंट व्यावसायिक
"दसऱ्याची खरेदी बघता, यंदा दिवाळीची खरेदी देखील चांगली असणार आहे. त्यानिमित्ताने मालाचा साठा करून ठेवण्यात आला आहे. असे असले तरी ऑनलाइन खरेदीचा मात्र काहीसा व्यवसायावर परिणाम होत आहे." - जनार्दन बेळगावकर, घरगुती इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक
"सोन्याची गुंतवणूक सुरक्षित असते. अटीतटीच्या वेळी सोन्याचा आधार मिळत असतो. शिवाय सोन्याचे दरही काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये नागरिकांचा सोने खरेदीकडे मोठा कल असेल. त्यामुळे सोन्याची बाजारपेठ १०० टक्के असणार आहे."
- गिरीश नवसे, सराफ व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.