Buying Selling Team Election: बिनविरोधसाठी नेत्यांचे होणार का मनोमिलन? बुधवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

Election
Electionesakal
Updated on

येवला : तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तालुक्यात पडलेले वेगवेगळे गट आणि सुरू असलेल्या संघर्षामुळे या निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष लागून आहे.

मागील वेळेप्रमाणे नेत्यांचे मनोमिलन होऊन निवडणूक बिनविरोध होणार का, हाही प्रश्न आहे. दरम्यान, बुधवार (ता. २२)पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. (Buying Selling Team Election Deadline for filing applications Wednesday at yeola nashik)

यापूर्वी २०१६ मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक झाली होती. त्यावेळी अडचणीतील संघाला खर्चात टाकण्यापेक्षा उर्जितावस्था आणण्याच्या मुद्यावर नेत्यांचे मनोमिलन होऊन निवडणूक बिनविरोध झाली.

ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, सहकार नेते अंबादास बनकर व माजी सभापती संभाजीराजे पवार या चारही नेत्यांनी जागा वाटप करून आपापल्या समर्थकांना संचालकपदी संधी देऊन निवडणूक बिनविरोध केली होती. २०११ ला संघाची निवडणूक नेत्यांच्या मनोमिलनातून बिनविरोधच झाली होती.

संघाला उत्पन्नाचे साधने नसल्याने आताही संघ अडचणीतच आहे. हमीभावाच्या मका खरेदीतून संघाला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, मागील वर्षी खासगी बाजारात जास्त भाव असल्याने आणि या वर्षी मकाच न पिकल्याने खरेदीतून उत्पन्न मिळविण्याची संधी गेली आहे.

दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने संघावर निवडणुकीचा बोजा पडणे, अशा परिस्थितीत अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच अपेक्षा आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.

Election
Konkan Politics: मी लोकसभा नाही तर फक्त विधानसभाच लढवणार; दीपक केसरकर आक्रमक!

श्री. दराडे व शिंदे भुजबळांपासून दुरावले आहेत. त्यातच आरक्षणामुळे राजकारणही तप्त आहे, अशा परिस्थितीत संघाच्या निवडणुकीत या सर्व नेत्यांचे मनोमिलन होणार का, हा प्रश्न आहे.

दरम्यान, संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिवाळीदरम्यान जाहीर झाला आहे. आतापर्यंत याची अनेकांना माहिती नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

संघाच्या व्यक्तिगत सर्वसाधारण गटाच्या चार, सहकारी संस्था गटातील सहा, अनुसूचित जाती- जमातीची एक, महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीयांसाठी एक व भटक्या मुक्त जाती-जमातीसाठी एक, अशा १५ जागा आहेत.

यासाठी पात्र इच्छुकांना १६ ते २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी (ता. २३) अर्जांची छाननी होईल. २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. १७ डिसेंबरला मतदान होईल. १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Election
Shivsena Politics : कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! प्रवक्ते भोगटेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.