Nashik: कांदा निर्यातबंदी करीत रात्रीतून ट्रॅक्टरमागे हजारोंचे केले नुकसान; बच्चू कडूंकडे शेतकऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे

Colonel Chiman Chavan while informing the President of Divyang Welfare State Committee Bachu Kadu about the crop damage on Monday. Neighbors Akshay Makune, Ganesh Nimbalkar etc.
Colonel Chiman Chavan while informing the President of Divyang Welfare State Committee Bachu Kadu about the crop damage on Monday. Neighbors Akshay Makune, Ganesh Nimbalkar etc.esakal
Updated on

चांदवड : कांद्याची निर्यातबंदी करीत केंद्र सरकारने एका रात्रीतून ट्रॅक्टरमागे हजारो रुपयांचे नुकसान केले, असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी बांधावर पोहोचलेल्या दिव्यांग कल्याण राज्य समितीचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सोमवारी (ता. १८) कांदा उत्पादकांकडून ऐकाव्या लागल्या आहेत.

श्री. कडू यांच्याशी संवाद साधत असताना आर्थिक अडचणीत गुरफटलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या धरसोड धोरणांबद्दल संताप व्यक्त केला. (By banning onion export thousands of tractors damaged overnight Farmers have raised complaints to Bachu Kadu Nashik)

आमची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. आता तुम्ही काही तरी करावे, असे वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी श्री. कडू यांना सांगितले. जिल्ह्यातील चांदवड, निफाड, मनमाड परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे कांदा, द्राक्षांचे मोठे नुकसान झाले.

रविवारी (ता. १७) वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील कांदा-द्राक्ष उत्पादकांच्या मेळाव्यानंतर मुक्कामी थांबलेल्या श्री. कडू यांनी तळेगाव रोही, वडगाव पंगू, भडाणे, वागदर्डी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील कांदा, द्राक्षांसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट दिली. पंचनामे झाले आहेत. आता सर्वांची नजर सरकारच्या घोषणांकडे लागली आहे.

Colonel Chiman Chavan while informing the President of Divyang Welfare State Committee Bachu Kadu about the crop damage on Monday. Neighbors Akshay Makune, Ganesh Nimbalkar etc.
Bacchu Kadu News: खासदारांच्या पराभवाच्या भीतीने कांद्याची निर्यातबंदी : बच्चू कडू

नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी श्री. कडू हे बांधावर पोचले आणि शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती जाणून घेतली.

वडगाव पंगू येथील कर्नल चिमण चव्हाण, बबन चव्हाण, नानाभाऊ चव्हाण, गणेश शिरसाट, संजय चव्हाण, गोरख गोजरे, देवीदास गोजरे, दत्तू गोजरे यांच्या शेतात जाऊन श्री. कडू यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, भागवत झाल्टे, अक्षय माकुणे, भाऊसाहेब झाल्टे, शंकर झाल्टे, निवृत्ती झाल्टे, योगेश पगार, अरुण गोजरे, विलास चव्हाण, रवींद्र चव्हाण, जालिंदर गोजरे, गोरख गोजरे आदी उपस्थित होते.

Colonel Chiman Chavan while informing the President of Divyang Welfare State Committee Bachu Kadu about the crop damage on Monday. Neighbors Akshay Makune, Ganesh Nimbalkar etc.
Bacchu Kadu News: "माझ्या ऐवजी या आमदाराला करा राज्यमंत्री.." बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरचा दावा सोडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.