Nashik CA Foundation Result : सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये नाशिकची दिशा देशात प्रथम!

CA foundation exam result disha gujrathi first in county nashik news
CA foundation exam result disha gujrathi first in county nashik newsesakal
Updated on

Nashik CA Foundation Result : चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) शिक्षणक्रमाच्‍या पात्रतेसाठी घेतलेल्‍या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिकमधील दिशा सचिन गुजरानी हिने ३६८ गुण मिळवीत राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक पटकाविला आहे.

नाशिकमधील ३३० विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांची टक्‍केवारी २५.६२ इतकी आहे. (CA foundation exam result disha gujrathi first in county nashik news)

चार्टर्ड अकाउंट्‌स, अकाउंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्‍यातर्फे सनदी लेखापाल अभ्यासक्रमातील सीए फाउंडेशन शिक्षणक्रमाची परीक्षा जूनमध्ये घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी सीए फाउंडेशन परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीत नाशिकच्‍या अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारताना चमकदार कामगिरी केलेली होती.

यंदा सर्व विक्रम मोडीत काढताना दिशा गुजरानी हिने राष्ट्रीय क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. माइंड स्‍पार्क ॲकॅडमीचे मयूर संघवी यांच्‍या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना तिने ही कामगिरी केली. सीए फाउंडेशन परीक्षेला नाशिकमधून एक हजार २८८ विद्यार्थी सामोरे गेले होते. त्‍यापैकी ३३० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांची टक्‍केवारी २५.६२ टक्‍के इतकी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

CA foundation exam result disha gujrathi first in county nashik news
Success Story : व्हायचे होते शिक्षक, झाली फौजदार! रुबियाच्या नेमप्लेटवर आईचेही नाव

दिशाला ९२ टक्‍के गुण

दिशाने प्रिन्‍सिपल्‍स ॲन्ड प्रॅक्‍टिस ऑफ अकाउंटिंगमध्ये ९५ गुण, बिझनेस लॉ ॲन्ड बिझनेस करस्‍पॉन्‍डन्‍स ॲन्ड रिपोर्टिंगमध्ये ७९ गुण, बिझनेस मॅथेमॅटिक्‍स ॲन्ड लॉजिकल रिझनिंग ॲन्ड स्‍टॅटिस्‍टिक्‍समध्ये आणि बिझनेस इकॉनॉमिक्‍स ॲन्ड बिझनेस ॲन्ड कमर्शियल नॉलेज या विषयांमध्ये प्रत्‍येकी ९७, असे एकूण ३६८ गुण मिळविताना ९२ टक्‍के मिळविले आहेत.

यशस्‍वी विद्यार्थी असे

दिशा गुजरानीसमवेत अन्‍य यशस्‍वी विद्यार्थ्यांमध्ये दिव्‍या लढ्ढा (३३९ गुण), भक्‍ती गिते (३३९), मित बोथरा (३३६), साक्षी जैन (३३१), मानसी कोचर (३२९), प्रसन्न जैन (३२४), अद्वैत कोठारी (३१४), ऋचा आहिरराव (३०४), निधी जैन (३०२) यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. या विद्यार्थ्यांनी माइंड स्‍पार्क येथून परीक्षेची तयारी केली.

CA foundation exam result disha gujrathi first in county nashik news
Success Story : दिल्लीच्या तरूणाने मन जिंकलं! सिगारेटला रिसायकल करून बनवतोय टेडी बिअर, लाखोंची आहे वार्षिक उलाढाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()