Caste Certificate : जातप्रमाणपत्र पडताळणीच्या प्रलंबित अर्जांसाठी 'या' तारखांना मोहीम; येथे करा अर्ज....

Caste Certificate Verification
Caste Certificate Verificationesakal
Updated on

नाशिक : जिल्हा जात पडताळणी समितीकडे त्रुटी, पूर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी येत्या २८ आणि २९ कालावधीत विशेष मोहीम होणार आहे, अशी माहिती उपायुक्त तथा नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र (caste certificate) पडताळणी समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी दिली. (campaign for pending applications for caste certificate verification on March 28 29 nashik news)

जिल्हा जातपडताळणी समितीमार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर प्रणालीद्वारे संबंधित अर्जदारांना त्रुटी कळविल्या आहेत. पण त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्यांनी केलेली नाही, अशा प्रलंबित प्रकरणांच्या अर्जदारांनी त्रुटीसह व मूळ कागदपत्रांसह २८ व २९ मार्चला दुपारी २ ते ४ या वेळेत समिती कार्यालयाच्या सुनावणी कक्षात उपस्थित राहावे.

ज्या अर्जदारांकडून वर नमूद कालावधीत त्रुटींची पूर्तता न झाल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया अंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर 2023- 24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Caste Certificate Verification
Unseasonal Rain : अवकाळी पावसाचे सलग तिसऱ्या दिवशी शेतकरी राजावर आसमानी संकट

मूळ कागदपत्रांसह अर्ज करा

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत त्यांचे अर्ज जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मूळ कागदपत्र अपलोड करून ऑनलाईन अर्ज करावा
असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज, शपथपत्र व अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत जमा करावेत असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

"अर्जदारांनी अर्ज भरताना स्वतःचा ई मेल व मोबाईल क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समितीचा निर्णय किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे अर्जदाराने नोंदणी केलेल्या ई-मेल वर पाठवत असल्याने अर्जदारांनी आपला युझर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावे." - राकेश पाटील, उपायुक्त, सदस्य, जातप्रमाणपत्र पडताळणी समिती.

Caste Certificate Verification
Nashik News : मलनिस्सारण प्रकल्पाचे आधुनिकीकरण; DPRला लवकर मान्यता, भुजबळांच्या लक्षवेधीवर उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.