Nashik News : दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी तपासणी पथकांमार्फत धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी दिली आहे. (campaign Through inspection teams to prevent adulteration of milk products nashik news)
अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त विवेक पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, वैद्यमापन शास्त्राचे उपनियंत्रक अ. भि. गिरनारे आदी उपस्थित होते.
दूध विक्रेते, स्वीटमार्ट धारक, किरकोळ दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करताना ते पदार्थ उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहित व पदार्थांवर मुदतपूर्व दिनांक नमूद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच गुजरात राज्यातून येणाऱ्या खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.
पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेल्या दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर जिल्हास्तरीय समितीमार्फत दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.