Nashik : निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

NMC
NMCesakal
Updated on

नाशिक : महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी (NMC Election) प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदल्या जात आहे. त्यामुळे महापालिकेने निवडणूक कामाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या येत्या शनिवार व रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्या (leave) रद्द केल्या आहेत. त्यामुळे साप्ताहिक सुट्यांच्या दोन दिवस महापालिका सुरूच राहणार आहे. (Cancellation of NMC staff leave for election work Nashik News)

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूका होणार असून, त्यासाठी प्रारूप मतदार याद्यावर हरकती नोंदविण्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ३ जुलैपर्यत हरकती नोंदवून घेण्याचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा दोन्ही सुट्यांच्या दिवशी हे कामकाज चालणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, या दोन दिवसांच्या सुट्यांच्या काळात रजाही रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या दिवशीही दुपारी तीनपर्यंत कामाचा निपटारा करण्यासाठी महापालिकेत कामासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

NMC
सिंहस्थ मार्गाच्या भूसंपादनासाठी 9 कोटींची मागणी

महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी यासंदर्भात आदेश काढून या काळातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करू नयेत. या सुट्यांच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाचा निपटारा करण्याचे आदेश काढले आहेत.

NMC
Nashik : विमानसेवेसाठी राजकीय पाठबळाची कमतरता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.