Nashik Teacher Recruitment : शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू आहे.
याअंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून देण्यास सोमवार (ता.२९) पासून प्रारंभ झाला असला तरी, प्रात्याक्षिक पवित्र पोर्टल सुरूच झालेले नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. (Candidates suffer due to sacred portal failure nashik teacher recruitment news)
यातच, शासकीय शाळांची जाहिरात प्रसिद्ध नसल्याने संभ्रमावस्था आहे. त्यामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित शिक्षक भरतीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यात १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रीया राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.
जाहीर केल्याप्रमाणे या भरती प्रक्रियेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसू नये यासाठी शिक्षण विभागाने भरतीबाबतचे वेळापत्रक ठरवून दिले. रयत शिक्षण संस्थेसह बहुतांश खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या आहेत.
मात्र, जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांची जाहिरात अपलोड झालेली नसल्याचे चित्र आहे. पवित्र पोर्टलवर ज्या ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेण्यास सुरवात केली खरी मात्र, प्रत्यक्षात पोर्टल खुले झाले नसल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे.
वारंवार प्रयत्न करूनही पोर्टलवर उमेदवार प्राधान्यक्रम भरू शकलेले नाहीत. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मंगळवारी (ता.३०) मुदत संपली.
त्यामुळे बुधवारी (ता.३१) सकाळी संबंधित जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. पोर्टलच्या तांत्रिक बिघाडाबाबत विभागाने कानावर हात ठेवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.