"बस करा आता..खरचं नाही सहन होत.." चार महिन्यांच्या गर्भवतीची आर्त हाक

reena pardeshi suicide.jpg
reena pardeshi suicide.jpg
Updated on

नाशिक / मालेगाव : आघार बुद्रुक (ता. मालेगाव) येथील माहेरवाशीण रीना परदेशी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती संदीपसह चौघांविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी तसेच रीनाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी (ता. 23) रात्री येथे कॅंडल मार्च काढण्यात आला.

अशी घडली घटना...

रीना चार महिन्यांची गर्भवती होती. पतीसह सासरकडील माहेरून पैसे आणण्यासाठी फोन वापरण्यावरून घरातील कामावरून छळ करीत होते. छळ असह्य झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रीना परदेशी हिने पतीचे अनैतिक संबंध व सासरकडून होणाऱ्या छळास कंटाळून गर्भवती असताना टाकेद (ता. इगतपुरी) येथे छळाला कंटाळून 17 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा भाऊ विशालच्या तक्रारीवरून घोटी पोलिस ठाण्यात पती संदीप पंढरीनाथ चौधरी, सासू लताबाई, दीर बाळू व जाऊ वैशाली या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पतीला अटक करण्यात आली असून, उर्वरित तिघे फरारी आहेत.

कठोर शिक्षेसाठी मालेगावी कॅंडल मार्च 

आघार बुद्रुक (ता. मालेगाव) येथील माहेरवाशीण रीना परदेशी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती संदीपसह चौघांविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी तसेच रीनाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी (ता. 23) रात्री येथे कॅंडल मार्च काढण्यात आला. श्रीरामनगर भागातील हुतात्मा स्मारक येथून कॅंडल मार्चला सुरवात झाली. श्रीरानगर, मोहन चित्रपटगृह, कॅम्प रोड या मार्गाने महात्मा गांधी पुतळ्याजवळ मार्चचे विसर्जन झाले. तेथे रीनाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संशयितांना कठोर शिक्षा व्हावी,

रीनाचा भाऊ वीरेंद्र परदेशी याने संशयितांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करावी. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कॅंडल मार्च काढण्यात आला. यात ललिता परदेशी, विशाल परदेशी, प्रवीण देवरे, प्रमोद राजपूत, वीरेंद्र परदेशी, आकाश परदेशी, अनिल शेलार, रूपाली परदेशी आदींसह दोनशेपेक्षा अधिक जण सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.