Nashik Accident News: त्र्यंबक रोडवर टायर फुटून कारची दुचाकीला धडक; 2 युवक ठार

Namdev Shit & Sunil Mahale
Namdev Shit & Sunil Mahaleesakal
Updated on

Nashik Accident News : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल संस्कृतीसमोर झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले. टायर फुटल्याने कार विरुद्ध दिशेवरील समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जाऊन धडकली. यात दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाल्याची घटना आज रात्री घडली.

नामदेव विठ्ठल शीत (वय ३६, रा. राजेवाडी, ता. नाशिक), सुनील मनोहर महाले (वय २६, रा. वाढोली, ता. त्र्यंबकेश्वर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. (Car collides with two wheeler after tire burst on Trimbak Road 2 youths killed Nashik Accident News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Namdev Shit & Sunil Mahale
Accident News : गडचिरोलीचे प्रसिद्ध रांगोळीकार युवराज बेहरे यांचा अपघाती मृत्यू

सदरचा अपघात सोमवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास हॉटेल संस्कृतीसमोर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबक-नाशिक रोडवरून भरधाव कारचे टायर फुटले. त्यामुळे भरधाव कार विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या महाले यांच्या दुचाकीवर व नंतर शीत यांच्या दुचाकीवर जाऊन कार धडकली.

या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गंभीर जखमी युवकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, सुनील महाले हे स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी असून, त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, तर नामदेव शीत यांच्या मागे पत्नी व पाच मुले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्वराज्य संघटनेचे करण गायकर व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी सातपूर पोलिसांत अपघाताचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.

Namdev Shit & Sunil Mahale
Accident: मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसली अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.