Cancer Cure: कर्करोग उपचारावर महत्त्वाची समजली जाणारी ‘कार्टी सेल’ (CAR-T) थेरपी एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतीच झाली.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वांत अत्याधुनिक थेरपी करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागात कर्करोगावर अद्ययावत उपचाराच्या दृष्टिकोनातून हा मोठा टप्पा समजला जात आहे. (CAR T cell therapy successful in cancer patients by smbt nashik news)
इम्म्युनोअॅक्टच्या क्लिनिकल ट्रायल अंतर्गत व टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये ५० रुग्णांवर हे उपचार करण्यात आले. यातील दोन रुग्ण एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ही थेरपी यशस्वी झाली. दोन्हीही रुग्णांना चांगले परिणाम बघावयास मिळत असल्याची माहिती एसएमबीटीचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ लविन विल्सन यांनी दिली.
इम्म्युनोअॅक्ट डॉ. राहुल पुरवार यांनी संशोधन केलेली संस्था आहे. टाटा मेमोरिअल सेंटरच्या ब्लड कॅन्सर विभागाचे डॉ. हसमुख जैन यांच्यासह तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रिन्सिपल क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन करण्यात आले. जगातील सर्वांत महागड्या समजल्या जाणाऱ्या कर्करोग उपचारावर कमीत कमी खर्चात ब्लड कॅन्सर झालेल्या रुग्णांवर उपचार करणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आयआयटी मुंबई व टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये संशोधन सुरू होते. अखेरीस या उपचार पद्धतीला मान्यता मिळाली असून, सुरवातीला ५० रुग्णांवर हे उपचार करण्यात आले. यातील दोन रुग्ण एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करून त्यांच्यावर ही थेरपी यशस्वी झाली. जगातील कॅन्सर उपचारावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च भारतीय संशोधनामुळे आता लाखांत आला आहे.
एसएमबीटीत जानेवारीपासून ‘कार्टी सेल’ थेरपी
जानेवारीपासून एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कार्टी सेल थेरपी युनिट (बीएमटी) सुरू करण्यात येणार आहेत. तेव्हापासून प्रत्यक्षात रुग्णांवर उपचार सुरू होणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आता कार्टी सेल थेरपी होणार असून, येथील निसर्गरम्य वातावरणात रुग्ण बरा होण्याचा दर यानिमित्ताने वाढणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.