Nashik Crime: तारण सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्था चेअरमनसह खातेदाराविरुद्ध गुन्हा

crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime : शहरातील चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेत महिला खातेदाराने तारण ठेवलेले सोने दुसऱ्या गोल्ड फायनान्सने टेकओव्हर करण्याची प्रक्रिया केली असता पतसंस्थेच्या चेअरमन आणि खातेदार महिलेने संगनमताने सोनेतारणावर मंजूर १६ लाख रुपयांची कर्जाऊ रक्कम व तारण सोने गोल्डलोन फायनान्सला हस्तांतरित न करता अपहार केला.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पंचवटी पोलिसांत अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. (case against credit institution chairman and account holder for misappropriation of mortgage gold Nashik Crime)

चिरायू पतसंस्थेचे चेअरमन राहुल मगनलाल बागमार-जैन (रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) यांच्यासह महिला खातेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला. दीपक रावसाहेब पठारे (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार ते मुंबई नाका येथील रुपीक कॅपिटल प्रा. लि.मध्ये रिजनल मॅनेजर आहेत.

चिरायू पतसंस्थेच्या खातेदार महिलेने रुपीक कंपनीशी ऑनलाइन संपर्क साधून पतसंस्थेत तारण ठेवलेले ५०७ ग्रॅम सोने टेकओव्हर करण्याची विनंती केली.

कागदपत्रांची पडताळणी, केवायसीनंतर महिला खातेदारास मंजूर झालेले १६ लाख दोन हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या पुण्यातील शाखेत वर्ग केले. तेच कर्ज महिलेने पतसंस्थेतील स्वत:च्या खात्यावर वर्ग केले.

रुपीक कंपनी तारण सोने ताब्यात घेण्यासाठी १५ डिसेंबर २०२२ ला पतसंस्थेत गेली असता चेअरमन बागमार यांनी महिला खातेदाराच्या तारण सोन्यावर जप्ती आल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime
Jalgaon Crime : तक्रार घेऊन आला अन्‌ व्हीडीओ व्हायरल केला; तरूणास चोप

काही महिन्यांपूर्वी खातेदार महिला ही तिच्या एका मित्राला पतसंस्थेत जामीनदार झाली होती. तिच्या मित्राने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने चिरायू पतसंस्थेने तिच्या तारण सोन्यावर आणि रुपीक लिमिटेडने ट्रान्स्फर केलेल्या रकमेवर जप्ती आणल्याचे सांगितले.

या संदर्भात पठारे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने बागमार यांच्यासह महिला खातेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंचवटी पोलिसांना दिले. गुन्हा पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलिसांकडे वर्ग केला आहे.

"रुपीक कॅपिटल कंपनीने कर्जदाराचे कर्ज टेकओव्हर करताना आमच्याशी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता परस्पर कर्ज दिले आहे. तसेच, कर्जदाराचे सोने न्यायालयाच्याच आदेशान्वये जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात संस्था कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करीत आहोत." - डॉ. राहुल बागमार-जैन, चेअरमन, चिरायू पतसंस्था, पंचवटी

crime
Nanded Crime: १५ लाख ३१ हजारांचा ७१ किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही; तीन आरोपींना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.