सिडको (नाशिक) : कोरोना रुग्णांची संख्या शहरात आटोक्यात येत आहे. मात्र, प्रशासन तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी करत आहे. अशा परिस्थितीच कोविडकाळात विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करणे शिवसेना, मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महागात पडले असून येथील अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Case filed against Shiv Sena and MNS office bearers in Nashik)
पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयानुसार कोरोनाकाळातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानुसार शिवसेनेचे विभागप्रमुख सुयश पाटील (रा. सिडको) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून स्वतःचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी पाटील यांच्यासह नीलेश साळुंखे, निखिल मेदळे, एकनाथ शिंदे यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे देवचंद केदारे (रा. महाकाली चौक, सिडको ) यांच्यासह अर्जुन वेताळ, ललित वाघ, नितीन माळी, संदेश जगताप व इतर दहा ते पंधरा जणांनी मिळून साईबाबा मंदिर महाकाली चौक येथे आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाची त्यांनी कुठल्या प्रकारची परवानगी घेतली नसल्याने गुन्हा दाखल केला. पुढील तपास निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती भड, रमेश टोपले व संतोष संगम करीत आहेत.
(Case filed against Shiv Sena and MNS office bearers in Nashik)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.