Nashik News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
या खटल्याची पुढील सुनावणी येत्या १६ मार्च रोजी होणार आहे. (case has been filed against Rahul Gandhi in Nashik District Court nashik news)
खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी हिंगोली आणि अकोला याठिकाणी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या त्या विधानांमुळे सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या.
त्यामुळे नाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी गेल्या वर्षी खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवून चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली होती. परंतु त्यांच्या त्या नोटिसीला कोणतेही उत्तर आले नाही.
त्यामुळे याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये अर्जदार भुतडा यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या १६ मार्च रोजी होणार आहे.
त्यानंतर, खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाकडून समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. भुतडा यांच्या वतीने ॲड. मनोज पिंगळे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
''स्वा. सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खासदार राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नाही. त्यामुळे न्यायालयात त्यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे.''- ॲड. मनोज पिंगळे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.