Nashik News : शहरात 2 महिलांच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

Women Rape News
Women Rape Newsesakal
Updated on

नाशिक : शहरामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांचे विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका गुन्ह्यात ॲट्रोसिटीअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आडगाव हद्दीतील पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, संशयित ऋषिकेश कांगले (२४, रा. औरंगाबाद रोड, नाशिक) याने गेल्या ५ एप्रिल २०२२ ते १५ जुलै २०२२ या दरम्यान पीडितेच्या सोशल मीडियावरील इन्स्ट्राग्राम या अकांऊटचा वारंवार पाठलाग केला.

तसेच त्यावर अश्लील मेसेज पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून, आडगाव पोलिसात विनयभंगासह अॅट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे हे करीत आहेत. (case has been registered in case of molestation of 2 women in the city nashik Crime news)

हेही वाचा :  प्रेमाला धर्म आहे...?

Women Rape News
Nashik Crime News : सिन्नरला दुचाकी चोरटे गजाआड

त्याचप्रमाणे, गंगापूर रोड परिसरातील पीडित विवाहितेचे संशयित रोहित पांचाळ (रा. दिल्ली) याच्याशी प्रेमसंबंध होते. संशयिताने पीडितेचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढले होते. तसेच, सोशल मीडियावरून संपर्क साधून अश्लील संवाद साधला होता.

संशयिताने सदरचे अश्लील व्हिडिओ व फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेच्या आई -वडिलांसह पती व तिच्या मैत्रिणींना पाठवून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्याचप्रमाणे ३ जुलै २०२२ रोजी पीडितेच्या घरी येऊन मारहाण केली व सोन्याचे दागिने, पैसे फोन पेद्वारे घेऊन आयफोन फोडून नुकसान केले होते. या प्रकरणी गंगापूर पोलिसात विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००, ६७, ६७अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख तपास करीत आहेत.

Women Rape News
Nashik News : कॅट स्पर्धेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.