Nashik News : डॉ. भारती पवार यांच्या बंगल्यात आरडाओरडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Dr Bharti Pawar
Dr Bharti Pawaresakal
Updated on

Nashik News : गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या बंगल्याच्या आवारात येऊन आरडाओरड केला.

तसेच पोलिस कर्मचारी व स्वीय सहाय्यकांना धमकावल्याप्रकरणी वकील महिलेसह तिच्या तीन साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (case has registered for obstructing government work in Union Minister bungalow nashik news)

अश्विनी धर्मराज कनोज (रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. पवार यांचा गंगापूर रोडवरील आनंदनगरमध्ये बंगला आहे. या ठिकाणी मंगळवारी (ता.३) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास संशयित ॲड. अलका शेळके (मोरे पाटील) यांच्यासह एक महिला व दोन पुरुष आले.

डॉ. पवार या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत होत्या. तेव्हा ॲड. शेळके व सहकाऱ्यांनी आरडाओरड करून कामात अडथळा आणला.

Dr Bharti Pawar
Nashik Airplane Service : होणार आहे... पण कधी? आचके खात सुरू असलेल्या सेवेला हवा बूस्टर

डॉ. पवारांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी व स्वीय सहाय्यकांशी अरेरावी केली. ‘तुमच्या विरोधात आंदोलन करेल’, असे धमकावले. या प्रकरणी संशयित महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर सुरू असलेल्या एका आंदोलनाला आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी भेट द्यावी, अशी संशयित महिला मागणी घेऊन बंगल्यात आल्याचे समजते. गंगापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Dr Bharti Pawar
Nipun Utsav Karyakram : शाळांमधील निपुण उत्सव कार्यक्रमांची पडताळणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()