सातपूर (जि. नाशिक) : येथील आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे पुत्र व माजी नगरसेविका दिक्षा लोंढे यांचे पती दीपक लोंढे यांच्यासह अन्य साथीदारांविरुद्ध पाच लाख रूपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुलशन भदोरीया यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case of extortion filed against Deepak Londhe husband of former corporator Diksha Londhe Nashik Crime News)
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दीपक ऊर्फ नाना लोंढे यांच्यासह दिलीप झाल्टे, पुंडलिक साळवे यांनी सातपूर एमआयडीसीमधील प्लॉट नंबर एस. एस. ४१ वर १२ फेब्रुवारीला ममता एन्टरप्रायजेस कंपनीच्या ठिकाणी फौजदारी स्वरूपात अतिक्रमण करत गैरकायद्याची मंडळी जमा केली.
फिर्यादी गुलशन भदोरिया यांना धमकावत कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. कंपनीचा गाळा खाली करून द्यायचा नसेल तर त्या बदल्यात सुमारे पाच लाख रुपये मागितले. गुन्ह्याचा तपास सातपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.