नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील ट्रान्सपोर्टमधून सुमारे १० लाखांचे द्राक्षाचा (Grapes) माल भरून परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला. (case of mutual selling of grapes worth about 10 lakhs from transport in Sharad Chandra Pawar market yard nashik news)
याप्रकरणी संशयित रमणजित सिंग सिंधू, जकतार सिंग, विक्रमजित सिंग या संशयितांविरोधात पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणजित सिंग कुलदीपसिंग औलक (रा.प्रेरणा बंगला, विधातेनगर, हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे शरदचंद्र पवारमार्केट यार्डात ट्रान्सपोर्टचे दुकान गाळा नं. ५ येते आहे.
गेल्या २१ ते २५ तारखेदरम्यान, त्यांनी दुकानात काळ्या व हिरव्या द्राक्षांचा माल भरलेला होता. ट्रक मालक जकतार सिंग व विक्रतजित सिंग आणि ट्रकचालक रमणसिंग यांनी संगनमताने व्यापारी औलक यांचा विश्वास संपादन करून ट्रकमध्ये (पीबी १० एचइ ८५१३) ७ लाख १८ हजार ५०० रुपयांचा काळ्या द्राक्षांचे ९५८ कॅरेट,
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
१ लाख ८६ हजार ७५० रुपयांचा हिरव्या द्राक्षांचा ४१५ कॅरेट, १ लाख ३७ हजार ३०० रुपयांचे १३७३ प्लॅस्टिकचे कॅरेट माल असा १० लाख ४२ हजार ५५० रुपयांचा माल भरला आणि त्याची परस्पर विक्री केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक देवरे हे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.