रुग्णालयात कार घुसविणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

भाजपा नगरसेविका (bjp corporator) सीमा ताजने (Seema Tajane) यांचे पती राजेंद्र ताजने यांनी इनोव्हा कार रुग्णालयात घुसवत रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार रात्री समोर आला होता.
Bytco Hospital
Bytco HospitalSakal
Updated on

नाशिक : येथील नविन बिटको रुग्णालयात (bytco hospital) भाजपा नगरसेविका (bjp corporator) सीमा ताजने (Seema Tajane) यांचे पती राजेंद्र ताजने यांनी इनोव्हा कार रुग्णालयात घुसवत रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार रात्री समोर आला होता. हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याचा व इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत मेन गेटची केली या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. (case registered against the BJP corporator Seema Tajane Husband who drove a car into the hospital)

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. अतुल विजय सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजेंद्र (कन्नू ) ताजणे याने ईनोव्हा कार ( एमएच १५ - ईई ७७ ९९ ) वेगाने नवीन बिटको हॉस्पिटल इमारतीच्या पोर्चच्या काचा फोडून आत घुसवली व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. तसेच स्टाफ व नर्स यांच्यावर पेव्हर ब्लॉक फेकून मारत शासकीय कामकाजात अडथळा आणला. तसेच तेथे उपस्थित रुग्णाचे नातेवाईक देवा मल्हारी बोडके यांना चापटीने मारहाण तसेच शिवीगाळ व दमदाटी करत दहशत पसरवली.

या तक्रारीन्वये कन्नू ताजणेविरुद्ध भादंवि कायदा कलम ३५३ , ३३६ , ३२३ , ५०४ , ५०६ , ४२७ , १८८ , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १ ९ ८४ चे कलम ३ , महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था हिंसक कृती अधिनियम २०१० चे कलम ४ , अधिनियम २०२० चे कलम ३,६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली तपास करत आहेत.

(case registered against the BJP corporator Seema Tajane Husband who drove a car into the hospital)

Bytco Hospital
VIDEO : भाजप नगरसेविकेच्या पतीने रुग्णालयात घुसविली कार; नाशिकमधील संतापजनक प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.