Nashik Bribe Crime : सुहास कांदेंकडे खंडणीची मागणी; नीलेश माईणकरांवर गुन्हा

bribe case
bribe caseesakal
Updated on

Nashik News : चार लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईणकर यांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सात वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणातील तक्रारीत आमदार सुहास कांदे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयीन आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case was registered against Senior Inspector Nilesh Mainkar in bribe case nashik crime )

मागील आठवड्यात निरीक्षक माईणकर यांना पोलिस महासंचालकाचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलिस पदक मिळाले आहे. तर तीन दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी माईणकर यांची उपनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदावरून शहर नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

गेल्या सात वर्षांपासूनच महात्मानगर भागातील एका प्लॉटच्या जमिनीचे हे प्रकरण असून, त्याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. याप्रकरणात आता सत्तारूढ पक्षाचे आमदार असलेले सुहास कांदे यांनी न्यायालयामार्फत तक्रार केल्याने आमदार विरुद्ध वरिष्ठ निरीक्षक, असे हे प्रकरण चर्चेत आले आहे.

काय आहे प्रकरण

महात्मानगर येथील रहिवासी असलेल्या पण काही दिवसांपासून स्थाईक असलेल्या श्रीमती सावंत या महिलेचा महात्मानगरला एका भूखंड आहे. साधारण तीन कोटींच्या रुपये मूल्याच्या या भूखंडावर २०१६ ला कुणीतरी परस्पर दुसऱ्यानेच नाव लावल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे महिलेने पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

bribe case
Dhule Bribe Crime : लाचखोरीमुळे ‘ट्रॅफिक’चा पुरता विचका!

आपल्या नावावर परस्पर दुसरीच महिला उभी करून जमीन लाटून फसवणुकीसंदर्भात सावंत यांनी फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त सिंघल यांची भेट घेउन कैफियत मांडल्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी निरीक्षक नीलेश माईणकर यांच्याकडे तपासासाठी असताना माईणकर व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने सावंत यांच्या नावावर उभी केलेली बोगस महिला शोधून काढीत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सावंत यांच्या नावाने परस्पर खाते उघडून काही व्यवहार केल्याचे उघडकीस आणत मनमाड येथील भंडारी यांच्यासह काही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

कांदे यांचा संबंध

जमीन लाटण्याच्या या प्रकरणात जमीनमालक असलेली मूळ महिला आणि तिच्या जागी उभी केलेली बनावट महिला, जिल्हा बँकेतील व्यवहार, फोन कॉल डिटेल्स असा सगळा तपासाचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर २०१७ मध्ये नाशिक पोलिसांनी यात दोषारोपपत्र दाखल केले. यात मनमाड येथील संशयितासह सुहास कांदे यांचे नाव पोलिसांनी घेतले.

bribe case
Nashik Bribe Crime : लाचखोर सागर डगळे यास 2 दिवसांची पोलिस कोठडी

मात्र, सुहास कांदे यांनी या प्रकरणात राजकीय हेतून आपले नाव निष्कारण गोवल्याची तक्रार करीत, आधी स्थानिक न्यायालयात त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात उच्च न्यायालयात त्यांच्या मागणीची दखल घेतली जाऊन त्यात आमदार कांदे यांचे नाव वगळण्याची मागणी मान्य होऊन कांदे यांचे नाव कमी केले गेले.

काही दिवसांपूर्वीच कांदे यांचे नाव कमी झाल्यानंतर कांदे यांनी कलम १५६ (३) नुसार याचिका केली. त्यात निरीक्षक माईणकर यांनी वेगवेगळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा दावा न्यायालयात केला. त्यात चार लाखांची खंडणी मागितल्याने खंडणीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने पोलिसांना आदेश देत निरीक्षक माईणकर यांच्याविरूरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

"गंगापूर पोलिस ठाण्यातील भूखंड लाटण्याच्या २०१६ दाखल प्रकरणाचा तपास माझ्याकडे असतानाच हा विषय आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर भाष्य करणे योग्य नाही." - नीलेश माईणकर, वरिष्ठ निरीक्षक, नियंत्रण कक्ष

bribe case
Crime News: महाराष्ट्र हादरला! चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात तरुणांचा सामूहिक बलात्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.