Nashik News : महाविद्यालयातच मिळणार जातपडताळणी प्रमाणपत्र; महाराष्ट्रात मंडणगड पॅटर्न!

Caste Validity Certificate
Caste Validity Certificateesakal
Updated on

नाशिक : जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी-पालकांची वणवण थांबणार आहे. आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच जातपडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांतर्फे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Caste verification certificate will available in college itself Mandangad pattern in Maharashtra Nashik News)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, तसेच बार्टीचे महासंचालक ज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मंडणगड पॅटर्न राबविला जात आहे.

त्या अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नाशिकला येवला येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिर घेतले.

अपर जिल्हाधिकारी तथा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष गीतांजली बाविस्कर, तसेच सचिव माधव वाघ, प्राचार्य दादासाहेब मामुडे, अनुप्रीता डेंगळे, कपिल जगताप, रूपेश सावंत, पोपट अहिरे आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाबाबत माहिती देण्यात आली.

Caste Validity Certificate
Nashik News : वावरेनगर उद्यानाच्या स्वच्छतेस सुरवात; पोलीस गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

उपायुक्त माधव वाघ यांनी मंडणगड पॅटर्न, शासनाचे धोरण, महाविद्यालयाचे नोडेल अधिकारी यांची भूमिका, महाविद्यालयाची भूमिका, कागदपत्रे पूर्तता निकष याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्राविषयी माहिती पत्रके देण्यात आली. येवला व नांदगाव तालुक्यांतील महाविद्यालय नोडेल ऑफिसरमार्फत बारावी विज्ञान विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले.

जिल्ह्यातील बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या, तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी नाशिक जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे तयारी सुरू आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Caste Validity Certificate
Dhule Crime News : एकाच रात्री 6 घरांत चोरी! घरमालक गावी परतल्यावरच कळणार चोरीचा आकडा

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने व बार्टी महासंचालक ज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष शिबिर घेण्याचे नियोजन आहे.

महाविद्यालयांमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार

https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांत समितीतर्फे शिबिर सुरू करण्यात आली आहेत. संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांमार्फत स्वीकारण्यात येणार आहेत.

"मंडणगड पॅटर्न उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. समिती कार्यालयातून आपणास संपूर्ण सहकार्य केले जाईल."

- गीतांजली बाविस्कर (समितीप्रमुख, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती)

Caste Validity Certificate
CM Eknath Shinde Group : रिपाइं संघर्ष आघाडी मुख्यमंत्री शिंदे गटासोबत; रिपाइंत फूट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.