Heatstroke Remedy : सुर्य आग ओकू लागला असून, दिवसा प्रखर सुर्यकिरणांमुळे तापमान वाढलेले आहे. जिल्ह्यात कमाल तापमानाने चाळीशी ओलांडलेली आहे.
अशावेळी उन्हाच्या तडाख्यापासून व उष्माघातापासून बचावासाठी विशेष काळजी घेणे हा एकमेव उपाय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (Caution remedy for heat stroke Take care from heat of sun during summer nashik news)
उन्हाळ्यात सगळीकडेच आरोग्याचा प्रश्न उद्भण्याची, साथीचे आजार बळावण्याची शक्यता अधिक असतानाच, उष्माघाताचीही सर्वाधिक भीती असते. गेल्या काही दिवसांत आरोग्यविषयक समस्येमुळे क्लिनिक, दवाखान्यांत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला यानिमित्त दिला जातो आहे.
पाऱ्यासोबतच वाढतो उष्माघाताचा धोका
पारा २७ ते ३२ अंश सेल्सीयसपर्यंत असताना, दीर्घकाळ उन्हात वावर राहिल्यास थकवा येणे, अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. साधारणतः ४० अंश सेल्सीयस तापमान दीर्घकाळ राहिल्यास उष्माघाताचा सर्वाधिक धोका असतो.
तर, त्यापेक्षाही अधिक तापमान राहिल्यास उष्माघाताचा तीव्र त्रास होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत उन्हात दीर्घकाळ वावर आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
अशी घ्या काळजी...
* डोक्यावर उपरणे, टोपी, स्कार्फ घेत करा सुर्यकिरणांपासून बचाव
* घराबाहेर पडताना सैल व फिकट रंगाचे कपडे परीधान करावे
* पाण्याची बाटली सोबत बाळगावी, ठराविक अंतराने पाणी घ्यावे
* शक्यतो अतिथंड पाण्याचे सेवन टाळावे
* अतिथंड शितपेय किंवा बाहेरील पेय टाळणे योग्य
* घरगुती स्तरावर कैरी पन्हे, लिंबू सरबत ठरतो उपयुक्त
* उन्हातून घरी, कार्यालयात आल्यानंतर काही मिनिटांसाठी विश्रांती घेत पाणी प्यावे, तोंडावर थंड पाणी मरावे
* उन्हात दीर्घ काळ थांबावे लागत असेल, तर डोक्यावर थंड पाणी टाकलेले बरे
* बाहेर उघड्यावर विक्री होणारे ज्युस, फळ खाण्याचा मोह टाळावा
* हलकाफुलका व पौष्टीक आहार घेत सुदृढ राहावे
उष्माघातात जाणवणारी लक्षणे
उष्माघाताचा त्रास होत असताना काही लक्षणे जाणवतात. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. यात प्रामुख्याने डोकेदुखी, पोटदुखी, अचानक जुलाब सुरु होणे, अशक्तपणा, असंबद्ध बडबडणे, चक्कर येणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.
"सध्या पारा वाढत असताना उष्माघाताचा धोकादेखील वाढलेला आहे. अशावेळी घराबाहेर असताना शुद्ध व चांगले पाणी पिणे कधीही चांगले. उघड्यावरील ज्युस, फळांचा मोह टाळावा. जीवनशैलीत बदल करताना उन्हापासून बचाव करत निरोगी व सुदृढ राहावे."
-डॉ. समीर चंद्रात्रे, फिजिशियन.
भगवद्गीतेत सुदृढ आरोग्याचा मुलमंत्र, आहार-विहाराबाबत वर्णन केलेले आहे. सहाव्या अध्यायातील सतरा क्रमांकाचा श्लोक असा-
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥17॥
या श्लोकमध्ये नमुद केल्यानुसार जे आहार आणि विहाराला संयमित ठेवतात, ज्यांचे कर्म संतुलित असतात आणि निद्रेवर नियंत्रण ठेवतात, योगाचा अभ्यास करतात, अशा व्यक्ती आपल्या दुःखांना कमी करु शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.