Nashik Bribe Crime: नाशिकमध्ये CBIची कारवाई! PFच्या आयुक्तांसह दोघा लाचखोरांना अटक; 2 लाखांच्या लाचेची मागणी

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तिघांना 1 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.
CBI
CBIesakal
Updated on

नाशिक : तक्रारदाराच्या कंपनीच्या पीएफ प्रकरणाचा निपटारा करुन देण्यासाठी दाेन लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तासह इतर दोन जणांना सीबीआयने अटक केली.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तिघांना 1 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. पथकाने घरझडतीतुन महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. (CBI action in Nashik Two bribe takers arrested along with PF commissioner arrested Demanding bribe of 2 lakhs Nashik Bribe Crime)

गणेश आरोटे असे लाचखोर प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्ताचे नाव आहे. तर, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा आणि खासगी पीएफ एजंट बी. एस. मंगलीकर अशी अन्य दोघा संशयितांची नावे आहेत.

तिघा संशयितांविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दाखल झाली हाेती. तक्रारदाराच्या फर्मशी निगडीत पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दाेन लाख रुपये लाचेची मागणी आराेटे याने तक्रारदाराला खाजगी पीएफ एजंटच्या माध्यमातून केली हाेती.

CBI
Jalgaon bribe Crime : वीज कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

त्यानंतर तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार नाेंदविली. त्यानुसार सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. सीबीआयने झडतीसत्र राबविले असता त्यात अर्थपूर्ण व्यवहाराशी निगडीत तपशील असलेल्या डायरी जप्त केली.

तिघांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले असता १ जानेवारीपर्यंत सिबीआय काेठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कारवाई सिबीआयचे डीआयजी डॉ सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सिबीआय पोलीस निरीक्षक रणजित पांडे यांच्या पथकाने केली.

CBI
Nandurbar Bribe Crime : 10 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षकासह शिपाई ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.