Nashik News: टोमॅटो पिकावर CCTVची नजर! कोकणगावच्या शेतकऱ्याचा नवा फंडा

Solar Panel and camera
Solar Panel and cameraesakal
Updated on

Nashik News : टोमॅटो पिकाला गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी दर मिळत आहे. अनेक ठिकाणी तर टोमॅटो चोरीच्या घटना घडल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकऱ्याने आपल्या तीन एकर टोमॅटो पिक घेतलेल्या शेतात चार सीसीटीव्ही बसविले आहेत. (CCTV eyes on tomato crop Kokangaon farmers new idea for thet Nashik News)

सध्या टोमॅटो पिकाला प्रति क्रेट्स कमीत कमी २३०० तर जास्तीत जास्त ५ हजार रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारातही चांगला दर मिळतो आहे.

यापूर्वी द्राक्ष चोरीला जाण्याचे प्रकार घडल्याचे आपण ऐकले आहे. परंतु, टोमॅटो भाव खात असल्याने टोमॅटो चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहे.

याच प्रकाराला आळा घालण्यासाठी कोकणगाव येथील शेतकरी अब्दुलगणी सय्यद यांनी आपल्या तीन एकर टोमॅटो पिक असलेल्या शेतात तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. सय्यद यांनी यावर्षी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Solar Panel and camera
Nashik Monsoon Tourism: पावसाची उघडीप, पर्यटनस्थळे गजबजली! हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर

सध्या काढणी सुरू असून, प्रति क्रेट्स २५०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे. तीन एकर टोमॅटो पिक घेण्यासाठी सय्यद यांना पाच ते सहा लाख रुपये खर्च आला आहे. तर सीसीटीव्ही बसविण्यासाठी २५ हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

"सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. त्यातच आमची शेती घरापासून जास्त अंतरावर आहे. त्यामुळे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. काही ठिकणी अज्ञात व्यक्तींकडून टोमॅटोचे नुकसान व चोरी झाली आहे. अशा घटना होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी."

- अब्दुलगणी सय्यद, शेतकरी, कोकणगाव

Solar Panel and camera
Nashik News: गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ठराव; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्याचा बैठकीत निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.