Nashik Police: सोनसाखळी चोरट्यांवर CCTVचा वॉच! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज

Police watch
Police watchesakal
Updated on

Nashik Police : आगामी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करून त्यांच्या सोनसाखळींवर डल्ला मारण्याच्या घटना घडतात.

त्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करतानाच, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे निर्माण करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी परिमंडळ एकला दिले आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त देवी मंदिरांमध्ये पायी जाणाऱ्या महिला भाविकांची संख्या अधिक असते. या संधीचा फायदा घेत सोनसाखळी चोरटे महिलांचे दागिने खेचून नेतात. याबाबत महिलांना सावधगिरीचा इशारा देतानाच काळजी घेण्याचेही आवाहन आयुक्तांनी केले आहे. (CCTV watch on gold chain thieves Police system ready in view of Navratri festival Nashik)

रविवार (ता.१५) पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. ठिकठिकाणी गरबा-दांडियाचेही आयोजन केले जाते. तसेच, शहराचे कुलदैवत कालिका देवी यात्रोत्सवही असतो.

त्यामुळे महिला देवीच्या दर्शनासह यात्रोत्सवात सहभागी होतात. याच काळात महिला मौल्यवान दागदागिने परिधान करून गर्दीच्या ठिकाणी जातात. यामुळे सोनसाखळी चोरट्यांना आयती संधी मिळते आणि मौल्यवान दागिने ओरबाडून नेण्याच्या घटना याच काळात जादा घडतात.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गत काही वर्षांचा आढावा घेत कालिका मंदिर यात्रोत्सवाच्या रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्यासह एकाच ठिकाणी महिलांची गर्दी होणार नाही.

याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देश परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना दिले आहेत. तसेच, पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत महिला पोलिसांचे गस्तीपथक सज्ज राहणार असल्याचेही आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

Police watch
Dhule Crime News: साळुंखे खून प्रकरणी 5 अटकेत; दिघी, रतलाम येथे पाठलाग करत एलसीबी पथकाकडून शिकंज्यात

महिलांनो, अशी सतर्कता बाळगा

* घराबाहेर पडताना वा गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागदागिने परिधान करणे टाळा

* गळ्याभोवती स्कार्प गुंडाळावा. जेणेकरून चोरट्याला गळ्यातील सोन्याचे दागिने खेचता येणार नाही वा त्यांना दिसणार नाही.

* गर्दीच्या ठिकाणी जाताना लहान मुलांच्या गळ्यातील वा कानातील दागिने काढून ठेवा.

* गर्दीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखा.

* संशयास्पद व्यक्ती/महिला आढळल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क साधा

"नवरात्रोत्सवात सोनसाखळीसारख्या घटना घडू नये यासाठी पोलिसांना सज्जतेचे निर्देश दिले आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करून काही रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. महिला गस्ती पथके तैनात केले जातील."- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Police watch
Crime News: धक्कादायक! घरातील गुप्तधन शोधण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.