नाशिक : मकरसंक्रांतीचे औचित्य साधत शहरात राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीने तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पंचवटीतील सर्वच मंदिरे गजबजून गेली. रामतीर्थावर स्नानासाठीही मोठी गर्दी उसळली होती.
मकरसंक्रांतीची पर्वणी साधण्यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक शनिवार (ता. १४) पासूनच शहरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांच्या वाहनांच्या मोठ्या संख्येने गंगाघाटावरील गौरी पटांगण अक्षरश: हाउसफुल झाल्याचा अनुभव यात्रेकरूंनी घेतला. (Celebrating Makar SankrantiCrowd gathered to bathe a Ram Tirtha Nashik News)
मोठ्या संख्येने वाहने आल्याने गंगाघाटावर पार्किंगसाठी जागाच शिल्लक नव्हती, त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडीही अनुभवण्यास मिळाली. कोरोना दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. भाविकांची पसंती रामतीर्थासह श्री काळाराम, कपालेश्वर, गोराराम, श्री गजानन महाराज मंदिर, सीता गुंफा आदींसह तपोवनातही मोठी गर्दी उसळली होती.
‘स्वामिनारायण’ ठरतेय आकर्षण
मागील वर्षीच्या उत्तरार्धात भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले तपोवन रस्त्यावरील नवीन शाही मार्गावरील स्वामिनारायण मंदिर भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. या ठिकाणी स्वच्छतेसह इतर बाबी भेट देणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. मंदिरात वीकएंडचे औचित्य साधत मोठी गर्दी उसळली असून, रविवारी गर्दीने उच्चांक गाठला होता.
स्नानाला मोठे महत्त्व
मकरसंक्रांतीच्या स्नानाला मोठे महत्त्व असल्याने बाहेरच्या भाविकांसह शहरातील अनेकांनी रामतीर्थात डुबकी मारली. रामतीर्थावर पहाटेपासून स्नानासाठी मोठी गर्दी उसळली होती. भाविकांची गर्दी व त्यातच मोठ्या प्रमाणावर वाहने आल्याने रामतीर्थ परिसरात दुपारपर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी झाली, ही कोंडी सोडविताना पोलिसांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.