नाशिक : कोरोनाकाळातील दोन वर्षांत नागरिक आरोग्याच्या बाबतीत सजग झाल्याचा दावा केला जात असला तरी तो दावा फक्त रुग्णालयाची बिले भरायला लागू नये म्हणून मेडिकल पॉलिसी काढण्यापुरताच मर्यादित राहिला आहे.
कोविडच्या चलतीच्या काळात वशिलेबाजी व ब्लॅकने कुप्या मिळवून टोचण्यात आल्या. केंद्रांवर दिवस-रात्र रांगा लावल्या गेल्या. कोविडचा जोर ओसरल्यानंतर मात्र केंद्रे ओस पडली. आता पुन्हा कोविडची चर्चा सुरू झाल्याने केंद्रांवर गर्दी होऊ लागली.
परंतु केंद्रांवर कुप्या उपलब्ध नसल्याने परतावे लागत आहे. (Centers crowded after need for vaccination SAKAL Exclusive nashik NMC news)
ज्या वेळी लसींच्या कुप्या होत्या त्या वळी लसीकरणासाठी नागरिक पुढे न आल्याने त्या वाया गेल्या. आता केंद्रच कुलूपबंद झाली आहेत. कोविडच्या तीन वर्षांच्या कालावधीत पहिला डोस घेतलेले ९३. ४६, दुसरा डोस घेतलेले ७६, तर तिसरा अर्थात बूस्टर डोस घेतलेले अवघे बारा टक्के नागरिक आहेत.
लसीकरणाच्या बाबतीत वर्गीकरण करायचे झाल्यास आणखी धक्कादायक माहिती समोर येते. अठरा वयोगटांपर्यंतच्या एकानेही बूस्टर डोस घेतला नाही. सध्या कोरोना रुग्ण वाढत आहे, अशा परिस्थिती केंद्रांवर गर्दी होत आहे.
परंतु लस उपलब्ध नसल्याने ३४ केंद्रे बंद करण्यात आली, तर तीनशे लसीच्या कुप्या वाया गेल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आरोग्य उपसंचालकांकडून दहा हजार लस मागविल्या आहेत.
"लस उपलब्ध होत्या त्या वेळी विचारणा होत नव्हती; लस नाही त्या वेळी आता लसीकरणासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे दहा हजार लशीची मागणी नोंदविली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर तरी नियमित डोस घ्यावे."- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
अशी आहे लसीकरणाची स्थती
लोकसंख्येनुसार पात्र लसधारक पहिला डोस दुसरा डोस बूस्टर डोस
१२ ते १४ वयोगट ५८,४५० ४८,४१९ ३७,९१७ ००
१५ ते १८ वयोगट ९०,३८३ ६२,७०१ ४६६८६ ००
१८ ते ४४ वयोगट ८,३९,४०० ७,५०,५५७ ६,४०,९९९ ८३,६१२
४५ पेक्षा अधिक ५,२४,३०० ५,५१,८५४ ४,२७,१५८ ८३,२६२
------------------------------------------------------------------------
एकूण १५,१२,५३३ १४,१३,५४१ ११,५२,७६० १,६६,८७४
लसीकरणाची टक्केवारी
वयोगट पहिला डोस दुसरा डोस बूस्टर डोस
१२ ते १४ ८३ ६५ ००
१५ ते १८ ६९ ५२ ००
१८ ते ४४ ८९ ७६ १०
४५ पेक्षा अधिक १०५ ८१ १६
-----------------------------------------------------------------
एकूण टक्केवारी ९३.४६ ७६ १२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.