Nashik News : जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या शोधासाठी केंद्रीय समिती नाशिकच्या दौऱ्यावर आली आहे. आजपासून तीन दिवस या समितीकडून जलस्रोतांचे शोध घेतले जाणार आहे.
त्यासाठी आलेल्या समितीचा आज दौरा होता, पेठ (जि. नाशिक) येथील दौऱ्यासाठी समितीच्या अध्यक्षांचे विमान उडालेही, पण निरभ्र हवामानातील समिती अध्यक्षांचे विमान नाशिक ऐवजी चक्क इंदूरला उतरले. परिणामी, उर्वरित सदस्यांनी दौरा पूर्ण केला. उद्या समिती अध्यक्षांची बैठक होणार आहे. (central committee visited Nashik to search for water sources in district nashik news)
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ‘कॅच द रेन' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यार्तंगत केंद्रीय पथक नाशिकच्या दौऱ्यावर आले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होवुन या पथकाचा शुक्रवारी (ता.१६) जिल्ह्यातील पेठ तालुक्यात दौरा ठरला.
नियोजित दौऱ्यानुसार समितीचे सदस्य दौऱ्यासाठी तयार झाले. समितीचे अध्यक्ष केंद्रीय वित्त विभागाचे उपसचिव महिमापत रे हे मात्र अहमदाबाद येथून विमानाने नाशिकला येणार होते. पण आज हवामान खराब असल्याने ते सकाळी अकराला नाशिकला येणे अपेक्षित असताना त्याचे विमान भरकटल्याने ते आलेच नाही.
त्याऐवजी त्यांचे विमान थेट इंदूरला उतरले. त्यानंतर इंदूरहून येण्यासाठी त्यांना तब्बल दुपारी चार वाजले. सहाजिकच, अध्यक्षाविनाच इतर सदस्यांना दौरा करावा लागला. सायंकाळी बैठक होवुन आता उद्या तिसऱ्या दिवशी पुढील नियोजन होणार आहे.
संबंधित यंत्रणांना उपाययोजना सुचविणार
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १२२२ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिली असून, या पाणी पुरवठा योजनांच्या जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी या पथकाकडून संबंधित यंत्रणांना उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत.
त्याच प्रमाणे नाशिक महापालिका हद्दीतील पारंपरिक जलस्रोतांचीही पाहणी या पथकाकडून केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात जलसंधारण, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलसंधारणाच्या कामांचा आढावा हे पथक घेणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काय आहे उपक्रम
केंद्राच्या या उपक्रमांतर्गत जलस्रोतांचे बळकटीकरणाचे उदिष्ट्य आहे. पथकात केंद्रीय वित्त मंत्रालयाचे उपसचिव रॅाय महिमापत रे, जलशक्ती अभियानाचे तांत्रिक अधिकारी पंकज बक्षे यांच्या नेतृत्वाखालील पथक तीन दिवसपुढील तीन दिवस हे पथक ग्रामीण भाग तसेच महापालिका क्षेत्रातील जलस्रोतांची पाहणी करणार आहे.
ठिकठिकाणी फिरून केंद्रीय पथक स्थानिक यंत्रणेच्या मदतीने जलस्रोतांचे शोध घेणार आहे. केंद्र सरकारची जलशक्ती अभियान कॅच द रेन उपक्रमात ३० सप्टेबर २०२३ पर्यंत कालावधीत हे काम केले जाणार आहे.
त्यात ठिकठिकणचे जलस्रोत शोधले जाणारअसून पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोतांचे जिओ टॅगिंग करणे, पिण्याच्या योजनांच्या भूजल स्रोतांचे पुनर्भरण करणे व ते स्रोत शोधून काढणे हा या मोहिमेचा हेतू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.