Onion Rate News : बफर स्टॉकमधून 25 रुपयांनी कांदा विकणार; भाव स्थिर राहण्यासाठी केंद्राचा निर्णय

Onion
Onionesakal
Updated on

Nashik Onion Rate : कांद्याच्या दरात ६० टक्क्याहून अधिकने वाढ झाल्याने केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतला. (Central government will sell onion at Rs 25 from buffer stock nashik news)

ग्राहक व्यवहार मंत्रालय, नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणणार आहे. हा कांदा २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विकले जाणार आहे.

देशभरात गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. १४ ऑक्टोबरला लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला २,८७० रुपये भाव मिळाला होता. मात्र गेल्या बारा दिवसांत आवक मंदावल्याने कांद्याच्या दरात ६५ टक्क्याने वाढ होत ५,८६० रुपयांचा दर मिळाला आहे.

Onion
Nashik Onion News : कांदा खरेदीदारांचे उखळ पांढरे अन शेतकरी कंगाल; गैरव्यवहार आरोपांच्या धडाडताहेत फैरी

त्यामुळे कांद्याच्या भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. ‘बफर स्टॉक’मधून २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला.

नवीन खरीप कांदा अजून एक महिन्यांनंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहण्याची शक्यता आहे. कांद्याला समाधानकारक भाव मिळत असून, कांदा उत्पादकाला आनंद होता, मात्र ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा फटका बाजारभावावर होतो का? हे लिलावानंतर स्पष्ट होईल.

Onion
Nashik Onion Rate : नामपूर बाजार समितीत कांद्याला सर्वोच्च 5245 हजाराचा भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.